Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

काँग्रेस भवन येथे काँग्रेस पक्ष सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ

जळगाव प्रतिनिधी । भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशान्वये राज्यात काँग्रेस पक्ष सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ आज १ नोव्हेंबर सकाळी १० वाजता माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.

शहरातील काँग्रेस भवनाच्या प्रांगणात सदस्य नोंदणी अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शहराध्यक्ष श्याम तायडे, जिल्हा काँग्रेस कमेटीचे सचिव विनोद कोळपकर, जिल्हा उपाध्यक्ष अविनाश भालेराव, विजय वाणी, दिपक सोनवणे, जाकीर बागवान, राहुल भालेराव, गणेश राठोड, शशिकांत तायडे, मालोजी पाटील, सखाराम मोरे, उमेश तायडे, कैलास महाजन, संजय सोनार, गोकुळ चव्हाण, मीराताई सोनवणे, योगिता शुक्ल, अमिना तडवी, शफी बागवान यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहर सरचिटणीस प्रदीप सोनवणे यांनी केले.

 

 

 

Exit mobile version