Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाचोऱ्यात बिज प्रकिया अभियानाला प्रारंभ

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | पाचोरा तालुक्यात राज्य शासनाचा कृषी विभाग आणि निर्मल बियाणे, पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने खरीप हंगाम-22 साठी विशेष बीज प्रकिया अभियानाला सुरुवात झाली असून १४ जून रोजी अभियानाचा समारोप करण्यात येणार आहे.

आमदार किशोर पाटील यांनी हिरवी झेंडी दाखवली. कार्यक्रमाचे उद्घाटन तहसिलदार कैलास चावडे यांचे हस्ते करण्यात आले.

पाचोरा तालुक्यात दि. ६ जुन रोजी अंतुर्ली बु”, अंतुर्ली खु”, लोहटार, बाळद, नाचणखेडा, वडगांव स्वामीचे, नगरदेवळा संगमेश्वर, चुंचाळे, पिंपळगाव खु”, आखतवाडे, नेरी व भडाळी येथे चित्ररथाद्वारे बीज प्रक्रिया अभियानाचा प्रचार करण्यात आला.  ७ जुन रोजी वडगांव मुलाने, दिघी, बदरखे, निपाणे, खाजोळा, टाकळी, पिंप्री बु”, सार्वे बु”, भोरटेक, घुसर्डी बु” व होळ, ८ जुन रोजी चुंचाळे, गाळण बु”, गाळण खु”, विष्णूनगर, हनुमानवाडी, तारखेडा, चिंचखेडा बुद्रुक, कृष्णापूरी, पुनगांव, मांडकी, ओझर, अंतुर्ली खु”, गोराडखेडा बु”, ९ जुन रोजी खेडगांव (नंदिचे), वेरुळी बु”, वेरुळी खु”, हडसन, पहाण, नांद्रा, मोहाडी, कुरंगी, माहिजी, वरसाडे, डोकलखेडा, दहिगाव, लासगाव, व सामनेर, १० जुन रोजी बांबरुड (राणीचे), आसनखेडा, बिल्दी, साजगांव, सांगवी, नाईकनगर, कुऱ्हाड खु”, कुऱ्हाड बु”, म्हसास, लोहारा, कळमसरा, ११ जुन रोजी शहापूरा, वडगांव बु”, वडगाव असेरी, वडगाव टेक, भातखंडे, परधाडे, मोंढाळे, शेवाळे, वाडी, निंभोरी बु”, निंभोरी खु”, शिंदाड, कडे वडगाव, १२ जुन रोजी पिंपरी खु” प्र. पा., पिंपळगाव (हरे.), वरसाडे, जवखेडी, वरसाडे, भोजे, चिंचपुरा, सावखेडा खु”, सावखेडा बु”, राजूरी बु”, राजुरी खु”, वाणेगांव व वरखेडी, १३ जुन रोजी भोकरी, सार्वे, अंबेवडगाव, वडगांव जोगे, कोकडी, कोल्हे, पिंप्री बु” प्र. पा., लोहारी बु”, लोहारी खु”, आर्वे, जारगाव, चिंचखेडा, सारोळा बु”, सारोळा खु”, १४ जुन रोजी खडकदेळा बु”, खडकदेवळा खु”, सारोळा खु”, डोंगरगाव, सातगाव (डोंगरी), सार्वे व गव्हुले या गावी प्रचार करण्यात येणार आहे.

याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी रमेश जाधव, पंचायत समितीचे कृषी अधिकारी एम. एस. भालेराव, मंडळ कृषी अधिकारी अशोक जाधव, अॅड. अभय पाटील, शिवदास पाटील, एस. आर. मोहिते, आर. आर. बागुल, निर्मल सीड्सचे रवी चौरपगार, कृषी पर्यवेक्षक विजय पाटील, कैलास घोंगडे, के. एफ. पाटील, सुनिल पाटील, रामेश्वर पाटील, राजेंद्र चौधरी, आत्मा योजनेचे समन्वयक सचिन भैरव, कृषी सहायक उमेश पाटील, एस. पी. बोरसे, सुनिल वारे, रमेश पाटील, संदिप कछवे, विद्या पानपाटील उपस्थित होते.

मोहिम यशस्वी करण्यासाठी आशामती जाधव, स्नेहल पटवर्धन, निलेश पाटील, संतोष चव्हाण, अशोक भोई, रविंद्र जोहरे, चेतन बागुल, रविंद्र पाटील, नाना पाटील, नरेश पाटील, प्रदिप मराठे, सतीष परदेशी व केशव शिंदे हे सहकार्य करत आहेत.

Exit mobile version