Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमत्त पाचोरा येथे मॅरेथॉन स्पर्धा

पाचोरा प्रतिनीधी । पाचोरा – भडगाव तालुका शिवसेना, युवासेना व महिला आघाडीच्या वतीने शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती महोत्सव निमित्त येत्या दि. २४ जानेवारी रोजी जिल्हास्तरिय भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 

गेल्या काही महिन्यांपासुन करोनामुळे थांबलेल्या जगाला सृदृढतेचा संदेश देण्यासाठी  “चला धाऊ या…करोनाला हरवु या….” असा संदेश देण्यासाठी या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले असल्याची माहीती आमदार किशोर पाटिल यांनी पञकार परिषदेत दिली. यावेळी आशिर्वाद इन्र्फाचे संचालक मुकुंद बिल्दीकर, शहर अध्यक्ष किशोर बारावकर, गणेश पाटील, स्वीय्य सहाय्यक राजु पाटील उपस्थित होते.

या जिल्हास्तरिय मॅरेथॉन स्पर्धेची चार गटात विभागणी केली आहे. यात खुल्या गटासाठी १० किलोमीटर अंतराची मर्यादा असुन यासाठी प्रथम पारितोषिक ११ हजार रुपये, द्वितिय पारितोषिक ७ हजार १०० रूपये, तर तृतिय पारितोषिक ५ हजार १०० रूपयांचे रोख बक्षिस ठेवण्यात आले आहे. २० वर्षा आतील युवांसाठी दुसर्‍या गटात ८ किलोमिटरचे अंतर मर्यादा ठेवण्यात आली असुन यासाठी पहिले बक्षिस ११ हजार, द्वितिय बक्षिस ७१०० रूपये तर तृतिय बक्षिस ५१०० रूपये ठेवण्यात आले आहे. जेष्ठ नागरिकांच्या तिसर्‍या गटासाठी ५ किलोमिटरची मर्यादा ठेवण्यात आली असुन यासाठी पहिले बक्षिस ५ हजार, द्वितिय ३१०० रूपये तर तृतिय २१०० रूपयांचे बक्षिस ठेवण्यात आले आहे. महिलांसाठी चौथ्या गटासाठी ५ किलोमिटरची मर्यादा असुन यासाठी पहिल्या क्रमांकास ५ हजार,द्वितियसाठी ३१००  रूपये तर तृतियसाठी २१०० रूपयांचे पारितोषिक ठेवण्यात आले आहे.

या स्पर्धेत सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपञ व टि— शर्ट देण्यात येणार आहे. या स्पर्धेचा मार्ग शिवसेना मध्यवर्ती  कार्यालय पासुन कृष्णापुरी, वरखेडी नाका, जामनेर रोड, भारत डेअरी बस स्थानक, जारगाव चौफुलीळ महाराणा प्रताप चौक परत छ. शिवाजी महाराज चौक व शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे समारोप होणार आहे. स्पर्धा सकाळी ८ वाजता होणार असुन यासाठी उपजिल्हाप्रमुख गणेश पाटिल, शहर प्रमुख किशोर बारावकर, अतुल महाजन, योगेश गंजे, डाॅ. विलास पाटिल, जे.के.पाटील व निलेश पाटील यांच्याशी संपर्क करावा असे अवाहन आमदार किशोर पाटील यांनी यावेळी केले.

 

Exit mobile version