Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जामनेरात स्व. सुरेश पालवेंचा प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रम

जामनेर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । शहरातील स्वर्गीय सुरेष पालवे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त पुतळ्याचे अनावर, वह्या व पेन वाटप करण्यात आले.

तळेगाव येथील येथील हिंदू हृदय सम्राट शिवसैनिक व सामाजिक, धार्मिक तसेच गोरगरिबांचे अन्नदाते कल्याण मुंबई, तळेगाव तालुका जामनेर येथे वास्तव्यास होते. मात्र त्यांचे २६ जून २०२१ रोजी कोरोनासी झुंज देत ब्रीच कॅण्डी हॉस्पिटल मुंबई मध्ये उपचार घेत असताना अखेर त्यांची प्राणज्योत मालवली अशा या महान थोर पुरुषांची वर्ष श्राद्ध निमित्त प्रथम पुण्यस्मरणाच्य दिवशी कै.सुरेश दगडू पालवे यांच्या पुतळ्याचे अनावरण त्यांच्या धर्मपत्नी श्रीमती मिराबाई पालवे, हरीष पालवे, डॉ. नरेश पालवे, मुलगी वर्षा पंटार, निलेष पंटार यांच्या हस्ते  करण्यात आले.

त्यांच्या गेल्याने तळेगाव आणि कल्याण मंबई येथे दुःखाचा डोंगर कोसळला होता. परंतु सुरेश पालवे हे आपल्यातून जरी निघून गेली असली तरी त्यांच्या किर्ती रूपाने नाव लौकिक असून त्यांच्या पुतळ्याच्या अनावरण विधीपूर्वक करण्यात आले. त्यानिमित्ताने ह.प.शिवदास महाराज खेडी पानेरा यांचा जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. कै.सुरेष पालवे हे फक्त ४ थी पास होते. त्यामुळे त्यांना खुप अडचणी आल्या मात्र त्यांनी शुन्यातुन विश्व निर्माण केले होते. त्यांना शिक्षणाचे महत्त्व कळाले होते म्हणून त्यांनी आपल्या तिन्ही मुलांना उच्च शिक्षण घेऊन चांगल्या हुद्द्यावर आहे. त्यांनी आपल्या सहवासातील लोकांना महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी जो शिक्षणाचा पाया रोवला त्याच पद्धतीने ते मार्गदर्शन करून गोरगरीब मुलांना शिक्षणाचा मार्ग सांगायचे त्यामुळे अनेक विद्यार्थी चांगल्या हुद्यावर असून स्वतःही शून्यातून विश्व निर्माण करणे दुसऱ्यांना सुद्धा त्या यांनी चांगल्या प्रगतीपथावर नेऊन ठेवले आहे.

विद्यार्थ्यांना वह्या व पेन वाटप

प्रथम पुण्यस्मरणानिमित्त जि.प.शाळा तळेगाव तेथे ३७५ विद्यार्थ्यांना वही व पेनाचे वाटप त्यांचे पुतणे तानाजी पालवे यांच्यामार्फत युवा सेना उपजिल्हा प्रमुख विश्वजीतराजे पाटील, शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख निळकंठ पाटील, उपतालुका प्रमुख अशोक जाधव, सुनील नानोटे, ग्रामपंचायत सदस्य गोपाल कोळी, किशोर पाटील, मुकेश जाधव, चंद्रकांत पाटील, योगेश वंजारी शालीक पालवे, कडुबा पालवे, वर्षा पंटार, महेमुदखा, पठाण, ग्यानदेव कोळी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी जय गजानन महाराज बहुउद्देशीय संस्था तळेगाव तसेच  शालिक पालवे, कडुबा पालवे, तानाजी पालवे, तसेच पालवे परीवार तळेगाव शेळगाव नागरिक ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले.

Exit mobile version