Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जामनेरात स्व. हरिभाऊ जावळे यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

जामनेर प्रतिनिधी । जामनेर येथे स्वर्गीय हरिभाऊ जावळे यांच्या पुण्यतिथीनिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने पक्ष कार्यालयामध्ये प्रतिमा पूजन करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, भाजपाचे ज्येष्ठ नेते छगन झाल्टे, जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव जितेंद्र पाटील, डॉ. प्रशांत भोंडे, नगरसेवक महेंद्र बाविस्कर, अतिश झाल्टे, नाना वाणी, दत्तू सोनवणे, भाजपा पदाधिकारी रवींद्र झाल्टे, दीपक तायडे सुभाष पवार, विजू शिरसाट आदी यावेळी उपस्थित होते.

 यावेळी भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, स्वर्गीय हरिभाऊ जावळे हे शेतकऱ्यांसाठी नेहमी काम करायचे, त्याच बरोबर भाजपा पक्ष वाढीमध्ये त्यांचे मोठे योगदान होते. ते नेहमी सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करायचे. त्यामुळे ते गेल्यामुळे पक्षाची मोठी हानी झाली आहे, अशी प्रतिक्रिया अभिवादन कार्यक्रमात बोलताना दिली.

Exit mobile version