Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

लता मंगेशकर यांची प्रकृती खालावली

मुंबई प्रतिनिधी | कोरोनाच्या संसर्गामुळे रूग्णालयात उपचार सुरू असलेल्या गानकोकिळा लता मंगेशकर यांची प्रकृती खालावली असून त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे.

लता मंगेशकर यांना कोरोना आणि न्युमोनियाची लागण झाल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्या प्रकृतीची चिंता सर्वांनाच लागून आहे. सर्वजण त्या लवकर बर्‍या व्हाव्यात अशी प्रार्थना करत आहेत. लता मंगेशकर या मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात मागच्या आठ दिवसांपासून आयसीयूमध्ये आहेत. आता लता मंगेशकर यांची तब्येत बिघडल्याची माहिती समोर आली आहे.

लता मंगेशकर यांच्यावार उपचार करणारे डॉक्टर प्रतीत यांनी सांगितलं की, लता मंगेशकर यांना काही दिवस रुग्णालयात देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. लता मंगेशकरत या सध्या आयसीयू मध्ये आहेत. अजून किती दिवस त्यांना असं रुग्णालयाच ठेवण्यात येणार आहे, याबद्दल काही सांगू शकत नसल्याचे त्यांनी सांगितलं. त्यांना कोणालाही भेटण्याची परवानगी नसल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

Exit mobile version