Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

लॅपटॉप चोरटा मुद्देमालासह पोलिसांच्या ताब्यात

चाळीसगाव – लाईव्ह ट्रेन्ड्स न्यूज प्रतिनिधी | चोरी केलेला लॅपटॉप घेऊन विक्रीसाठी गणेश कॉम्प्लेक्स परिसरात एक इसम संचार करत असल्याची गुप्त माहिती मिळताच शहर पोलिसांनी त्याला मुद्देमालासह ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे.

 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, फिर्यादी हर्ष प्रविण पाटील (वय २०) वर्षे रा. कन्नड जि. छत्रपती संभाजी नगर हे पुणे येथुन सरस्वती ट्रॅव्हलने काल गावी कन्नड येथे जात असतांना प्रवासादरम्यान ट्रॅव्हल सिग्नल चौक चाळीसगाव येथे सकाळी ६ वाजेच्या सुमारास थांबली. तेव्हा फिर्यादी हे ट्रॅव्हल्स मधुन खाली उतरत असतांना त्याच्या लक्षात आले की , त्यांचा लॅपटॉप असलेली बॅग ही कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी केली आहे. तेव्हा त्यांनी शोध घेतला परंतु काहीएक माहीती मिळुन आली नाही. तेव्हा नमुद फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गु.र.नं. ४१४ / २०२३ भा. द. वी. कलम ३७९ प्रमाणे लॅपटॉप व बॅग असे सुमारे १,०५,०००/- रुपये किमतीचे साहित्य चोरी झाले बाबत गुन्हा नोंद करण्यात आला.

 

दरम्यान, या प्रकरणी पोलीस अधिक्षक एम राजकुमार, अपर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे,  सहाय्यक पोलीस अधिक्षक अभयसिंग देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी पोलीस स्टेशन कडील डी. बी. पथक यांना गुन्हा उघडकीय आणण्याच्या योग्य त्या सुचना दिल्या होत्या. यानुसार तपासादरम्यान गुन्हे प्रकटीकरण शाखा मधील पोलीस अंमलदार पोना दिपक पाटील, पो.कॉं अमोल भोसले यांना चाळीसगाव शहरातील गणेश कॉम्प्लेक्स परिसरात एक इसम हा बिल नसलेला महागडा लॅपटॉप विक्री साठी घेवुन फिरत असल्याची गोपनीय माहीती प्राप्त झाली.

 

त्यानुसार लागलीच पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी पोउपनिरिक्षक सुहास आव्हाड, पोहेकॉ योगेश बेलदार, पोहेकॉं नितीन वाल्हे, पोना दिपक पाटील, तुकाराम चव्हाण, पो.कॉं अमोल भोसले, गणेश कुवर, निलेश पाटील, शरद पाटील, प्रविण जाधव, नंदकिशोर महाजन, विनोद खैरणार, मोहण सुर्यवंशी यांना रवाना केला. त्या ठिकाणी जावुन संशयीत इसम नामे योगेश शामलाल पाटील, (वय २७ वर्षे, रा. जुनेगाव, कजगाव ता. भडगाव) यास ताब्यात घेवुन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे गुन्ह्यात चोरी गेलेला लॅपटॉप मिळुन आला आहे. नमुद आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे.

 

या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या निर्देशानुसार पोना दिपक पाटील व पो.कॉं अमोल भोसले हे करित आहेत. तरी नागरिकांनी बस ट्रॅव्हल्स मध्ये प्रवासादरम्यान आपले मौल्यवान वस्तु, दागिने, पैसे इत्यादीची काळजी घ्यावी असे आवाहन पोलीसांकडुन करण्यात येत आहे.

Exit mobile version