Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

लॅप्रोस्कोपिक ऑन्कोसर्जन डॉ.शैलेश पुणतांबेकर यांची २३ रोजी कार्यशाळा

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | देश-विदेशात शस्त्रक्रिया करुन नावलौकिक प्राप्त केलेले सुप्रसिद्ध लॅप्रोस्कोपिक ऑन्कोसर्जन डॉ. शैलेश पुणतांबेकर यांच्या एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातर्फे करण्यात आले आहे.

शनिवार, २३ रोजी ही कार्यशाळा होणार असून या कार्यशाळेस जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्स यांचे प्रायोजकत्व लाभले आहे.

डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील अद्यावत ऑपरेशन थिएटर येथे लॅप्रोरोस्कोपी ऑन्कोसर्जन डॉ.शैलेश पुणतांबेकर हे स्वत: रुग्णावर उपचार करणार आहेत. त्याचे लाईव्ह डेमोस्टेशन रुग्णालयातील मोठ्या स्क्रीनवर दाखविण्यात येणार आहे. यानंतर दुपारी मास्टर प्लान ऑन लॅप्रोस्कोपी पेल्विक प्रोसीजर यावर डॉ.शैलेश पुणतांबेकर हे मार्गदर्शन करणार आहे.

या कार्यक्रमासाठी जळगाव जिल्ह्यातील स्त्रीरोग तज्ञांसह, सर्जन्स यांना आमंत्रित करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संकेत पाटील यांच्याशी ८६००००३०७५ संपर्क साधावा. तसेच या कार्यशाळेचा लाभ घ्यावा असे आवाहन गोदावरी फाऊंडेशनतर्फे करण्यात आले आहे.

डॉ.शैलेश पुणतांबेकर यांचा परिचय

डॉ. पुणतांबेकर यांनी सन १९८६ मध्ये ससून रुग्णालयात ज्युनिअर निवासी डॉक्टर म्हणून सेवा सुरु केली आहे. त्यांनतर टाटा हॉस्पिटल मधेही त्यांनी सेवा दिली असून आज केईएम आणि पुण्यातील गॅलेक्सी केअर लॅप्रोस्कोपी इन्स्टिटयूट येथे ते सेवा देत आहे.

Exit mobile version