Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

किनगाव येथे वीजपुरवठा करणाऱ्या वीज तारा लंपास ; गुन्हा दाखल

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील किनगाव येथील महावितरणच्या वीज उपकेंद्रांतर्गत असलेल्या गिरडगाव शेतशिवार परिसरात शेतकऱ्यांना वीजपुरवठा करणाऱ्या सिमेंट काँक्रीटच्या खांबावरील वीज तारा चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. किनगाव वीज उपकेंद्राचे सहाय्यक अभियंता पंकज विकास कांबळे यांनी यावल पोलीस ठाण्यात वीज वाहिन्या चोरीस गेल्याची तक्रार दाखल केली आहे.

गिरडगाव परिसरातील चुंचाळे रोडवरील शेतकरी नारायण भागवत बोरसे यांच्या शेताजवळील गिरडगाव ग्रुप क्र.०४ ( ०६४७५३४) पासून बेबाबाई तडवी यांच्या शेतापर्यंत असलेल्या चक्क 21 सिमेंटच्या उभ्या पोलवरील सिमेंट खांबा वरील विद्युत वाहिनीच्या विज तारा अज्ञात चोरट्यांनी कापून नेले आहेत. तसेच एक सिमेंट खांब आडवा पाळून त्याचे ही नुकसान करण्यात आले आहे. सदर घटनेची माहिती गिरडगाव येथील पोलीस पाटील अशोक पाटील यांनी प्रथम किनगाव वीज मंडळाचे सहायक अभियंता पंकज कांबळे यांना दूरध्वनीवरून दिली. लागलीच सहाय्यक अभियंता पंकज कांबळे यांनी वरिष्ठ तंत्रज्ञ दीपक दळवी , गणेश धनगर , कैलास भोई व इतर कर्मचारी यांना सोबत घेऊन  घटनास्थळी पाहणी केली.

यावेळी चोरट्यांनी जवळपास २१ खांबावरील विज तार रूपये ७१ हजार रुपये किमतीची विज तार चोरून नेल्याचे निदर्शनास आले. घटनास्थळी चोरट्यांनी तारांचे एक फुटाचे तुकडे करून पाच पाच किलोचे बंडल तयार केलेले घटनास्थळी आढळून आले. वीज तारा तोडण्यासाठी वापरण्यात आलेले दोन कटरही घटनास्थळी आढळून आल्याची माहिती मिळाली . याबाबत किनगाव वीज मंडळाचे सहायक अभियंता पंकज कांबळे यांनी विजेची तार चोरी झाल्याची तक्रार यावल पोलीस स्टेशनला दाखल केलेली आहे.  गेल्या वर्षीही चिंचोली शिवारातील उंटावद परिसरातील अशाच प्रकारे शेतशिवारातील वीज तारा गेल्यावर्षी चोरून नेल्याची घटना घडली होती.

चिंचोली सह आडगाव कासारखेडा किनगाव परिसरात गेल्या दोन-तीन दिवसांपासून शेत शिवारातील शेतकऱ्यांच्या विहिरीवरील केबल वायर स्टार्टर , ऑटो व इतर साहित्याची चोरी झाल्याच्या घटना ताज्या असतानाच पुन्हा चक्क वीज मंडळाच्या सिमेंट पोल वरील वीजवाहिनी च्या ताराच चोरून नेल्याने परिसरात खळबळ निर्माण झाली आहे.याबात पुढील तपास यावल पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.का.अजीज शेख करीत आहेत.

 

 

Exit mobile version