लाल निशाण पक्षातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । लाल निशान पक्षाच्या अध्यक्षांना दमदाटी करून धक्काबुक्की केली आणि मोदी सरकारच्या विरोधात घोषणा दिल्यातर जीवे ठार मारणाची धमकी देणाऱ्या अज्ञात दोन जणांना अटक करावी, या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाल निशाण पक्षाच्या वतीने निदर्शने करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

लाल निशाण पक्षाचे अध्यक्ष तथा संयुक्त किसान मोर्चाचे राज्याचे सदस्य सुभाष काकुस्ते हे पांजरा कोन ता. साक्री जि. धुळे येथे त्यांच्या राहत्या घरी असतांना चिकनगुनियाने आजारी होते. त्यावेळी दोन मोदी समर्थक तोंडावर मास्क लावून त्यांच्या घरात शिरले. दोघांनी काकुस्ते यांना धक्काबुक्की केली. तर ‘मोदी सरकारच्या विरोधात भाषणे करू नका व भाषणे न थांबल्यास जिवे ठार मारू’ अशी धमकी दिली. हा प्रकार अत्यंत गंभीर व निषेधार्थ आहे. आरएसएस व भाजपा वाले बहुजन कष्टकरी विरोधी, संविधान विरोधी, अभिव्यक्ती स्वातंत्र्य विरोधी, लोकशाही पायदळी तुडवून गुंडगिरीने समाजातील प्रश्न सोडवण्याच्या विचारांचा व कार्यपद्धतीने वागतात.

सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे किशोर ढमाले हे काकुस्ते यांच्या चळवळीतील निकटवर्तीय सहकार्य नेते आहेत. त्यांचाही ते पत्ता विचारत आहे. राजकीय हस्तक्षेप असल्याने ही गुंडगिरी वाढली आहे. या घटनेची चौकशी करण्यात यावी व संबंधित गुन्हेगारांना तातडीने अटक करावी अशी मागणी केली आहे. या निवेदनावर लाल निशाण पक्षाचे जळगाव जिल्हाध्यक्ष विकास अळवाणी, संघटक कविता सपकाळे, वैशाली अळवाणी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Protected Content