Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मयत पोलीस पाटील गजरे यांच्या वारसास ५० लाखांचा धनादेश

यावल प्रतिनिधी । कोरोना काळात सेवा बजवतांना यावलचे पोलीस पाटील मिलींद गजरे यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या वारसांना शासनाच्या वतीने ५० लाख रूपयांची आर्थिक मदत म्हणून प्रांताधिकारी कैलास कडलक यांच्याहस्ते वितरीत करण्यात आला.

 अधिक माहिती अशी की,  यावल पोलीस स्टेशनमध्ये कोरोना काळात सेवा बजावतांना ३१ मे २०२० रोजी उपचारा दरम्यान मरण पावलेले यावलचे पोलीस पाटील मिलिंद श्रावण गजरे यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या वारसांना ५० लाख रुपयाचा धनादेश फैजपुर विभागाचे प्रांताधिकारी कैलास कडलक, फैजपूर विभाग विभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे यांच्याहस्ते त्यांच्या पत्नी मिना मिलींद गजरे, त्यांचा मुलगा रत्नदिप मिलींद गजरे व अमरदीप मिलींद गजरे यांना देण्यात आज सकाळी ११ वाजता प्रांत कार्यालयात देण्यात आला. याप्रसंगी पोलीस निरिक्षक सुधीर पाटील, पोलीस पाटील संघटनेचे खानदेश विभागीय अध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन टेंभी, यावल तालुका पोलीस पाटील संघटना अध्यक्ष अशोक पाटील गिरडगाव यांची उपस्थिती होती.  

Exit mobile version