Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

लग्नाचे आमिष दाखवत विधवेवर बलात्कार

2rapecase 56 1

जळगाव प्रतिनिधी । लग्नाचे आमिष दाखवत 30 वर्षीय विधवेवर बलात्कार केल्याप्रकरणी रामानंद नगर पोलीसात एकावर गुन्हा दाखल करण्यात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पतीचे दोन वर्षांपुर्वी आकस्मात मृत्यू झालेल्या तीस वर्षीय पिडीत विधवा महिला आणि तहसील कार्यालयासमोर एका दुकानावर काम करणारा अक्षय गंगाधर जोशी यांची गेल्या दोन वर्षांपासून मैत्री होती. अक्षय जोशी याने पिडीत महिलेचा पती मयत झाल्यानंतर जवळीक साधला. दोघांचे प्रेमसंबंध झाले. पिडीत महिलेला एक मुलगी आणि मुलगा असून तुला सुखात देवीन आणि तुझ्याशी लग्न करेन असे सांगून पिडीतेच्या घरी शारिरीक संबंध ठेवले. त्यानंतर अक्षय जोशी आपल्याला फसवत असल्याची जाणीव झाल्यानंतर महिलेने त्याच्याशी बोलणे बंद केले. 24 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता अक्षय पिडीतेच्या घरी येवून पुन्हा बळजबरीकरून बलात्कार  केला. त्यानंतर फिर्यादीची दुचाकी घेवून पळून गेला असल्याची फिर्याद पिडीतेने दिली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीसात अक्षय जोशी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Exit mobile version