Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

एल. के. फाउंडेशनतर्फे शनिवारी दहीहंडी

dahihandi 1

जळगाव, प्रतिनिधी | शहरातील सागरपार्क मैदान उपलब्ध न झाल्याने रामदास कॉलनीच्या पटांगणात एल. के. फाउंडेशनतर्फे राजेशाही दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा शनिवार २४ ऑगस्ट रोजी दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येणार असल्याची माहिती एल. के. फाउंडेशनचे अध्यक्ष तथा मनपा भाजपा सभागृह नेते ललित कोल्हे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या कार्यक्रमासाठी जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री सुरेश जैन, पद्मश्री अॅड. उज्ज्वल निकम, जिल्हाधिकारी अविनास ढाकणे, जिल्हा पोलिस अधीक्षक पंजाबराव उगले, खासदार उन्मेष पाटील, खासदार रक्षा खडसे, आमदार चंदुलाल पटेल, आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार सुरेश भोळे, महापौर सीमा भोळे, उपमहापौर अश्विन सोनवणे, जैन समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. दहीहंडीच्या ठिकाणी महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून ३०० स्वयंसेवक मदतीला असणार आहेत. पार्किंगची व्यवस्थादेखील करण्यात आली आहे. नागरिकांच्या सुविधेसाठी एलईडी स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली आहे. दहीहंडी फोडणाऱ्या पथकाला आकर्षक बक्षिस देण्यात येणार असल्याचेही श्री. कोल्हे यांनी सांगितले आहे.

Exit mobile version