Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अति मद्यसेवनामुळे कुसुंबा येथील तरूणाचा मृत्यू

Crime

जळगाव प्रतिनिधी । कुसुंबा येथील तरूणाचा अति मद्यसेवनामुळे मृत्यू झाल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, शरद नाना पाटील (वय-33) रा. गणपती नगर कुसुंबा ता.जि. जळगाव हे एमआयडीसीतील पाईप कंपनीत ऑपरेटर म्हणून काम करतो. त्याला सहा महिन्यांपासून दारूचे व्यसन जडले होत. रविवारी सकाळी 9 वाजता कामावर जातो असे सांगून घराबाहेर पडला. रात्री उशीरापर्यंत घरी न आल्याने पत्नी मनिषा आणि नातेवाईकांनी शोधाशोध केल्यावरही मिळून आले नाही. आज सकाळी 8 वाजेच्या सुमारास गावातील शिवशाही हॉटेलच्या शेजारी असलेल्या चहाच्या टपरीजवळ मयत स्थितीत आढळून आले. नातेवाईकांनी तातडीने जिल्हा रूग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. मयताच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई- वडील असा परीवार आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Exit mobile version