Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कुऱ्हा हरदो येथे प्रेमीयुगुलाची आत्महत्येचा प्रयत्न; दोघांची प्रकृती गंभीर

poison sign

जळगाव प्रतिनिधी । घरात काहीही न सांगता प्रेमीयुगुलांनी गावातील बाजार मार्केट येथे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना आज सकाळी 7 ते 7.30 वाजेच्या सुमारास बोदवड तालुक्यातील कुऱ्हा हरदो येथे घडली. दोघांची प्रकृती चिंताजनक असून जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बोदवड तालुक्यातील कुऱ्हा हरदो येथील बारावीत शिकणारी 17 वर्षीय संगिता (नाव बदललेले) आणि गावातीलच समाधान (नाव बदललेले) वय – 20 यांनी दोघांनी बाजारातील नयन तारा पार्क येथे विषारी औषाध घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान दोघांनी विष घेतले आहे हे गल्लीतील एका नागरीकाच्या लक्षात आल्याने त्यांनी संगिताला ओळखले. त्यांनी थेट संगिताच्या वडीलांना मोबाईलने संपर्क करून घटनेची माहिती दिली. मुलीचे वडील घटनास्थळी धाव घेवून दोघांना तातडीने खासगी वाहनाने बोदवड ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. दरम्यान दोघांची प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना जळगाव येथील जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले आहे.

दरम्यान दोघांनी विष घेवून आत्महत्या केल्याचे नेमके कारण कळू शकले नाही. संगिताला चार बहिणी आणि आईवडील असून बोदवड येथील महाविद्यालयात संगिता बारावीत शिकते त्यामुळे दररोज कुऱ्हा हरदो ते बोदवड असा बसने प्रवास करते. आज सकाळी 5.45 ला घरातून कॉलेजला जाण्यासाठी निघाली होती तर समाधान हा गावात मिळेत ते काम करून आपला उदरनिर्वाह करतो. त्याचे वडील लहानपणीच निधन झाल्याने घरी आई एकटीच असते. दोघांचे गेल्या वर्षभरापासून प्रेमाचे सुत जुळले होते, दोघांचे प्रेमप्रकरण नातेवाईकांना कळाल्याच्या भितीने दोघांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला असावा असा अंदाज नातेवाईकांकडून बोलले जात होते. दोघांची प्रकृती गंभीर असून जिल्हा रूग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल केले आहे. दोघे कुटुंबियाचे नातेवाईकांनी जिल्हा वैद्यकिय महाविद्यालया धाव घेतल आहे.

Exit mobile version