Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कुरंगी विकासो निवडणूक बिनविरोध

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । 13 उमेदवारांविरुद्ध एकही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने तालुक्यातील कुरंगी विकास सोसायटीची निवडणूक बिनविरोध झाल्याने सोसायटीच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड करण्यात आली.

कुरंगी – बांबरुड गटात बांबरुड (राणीचे) येथील विकास सोसायटी नंतर कुरंगी विकास सोसायटीचे स्वभांडवल मोठ्या प्रमाणावर आहे या संस्थेला खत विभाग जोडलेला असल्याने मोठी आर्थिक उलाढाल होते या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक २०२२ ची बिनविरोध घेऊन दि. २२ जून रोजी विकास सोसायटीच्या कार्यालयात माजी आमदार दिलीप वाघ, बांबरुड (राणीचे) येथील माजी सरपंच दगाजी वाघ, पंचायत समितीचे सदस्य व गटनेते ललित वाघ यांच्यासह निवडणूक निर्णय अधिकारी व्ही. आय. खैरनार, सचिव विकास पाटील यांच्या सह नवनिर्वाचित संचालक यांच्या उपस्थितीत चेअरमनपदी रंगराव भाऊराव पाटील तर व्हा. चेअरमनपदी ज्ञानेश्वर पवार (धनगर) यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक भिकाजी पाटील, रामचंद्र धनगर यांच्यासह गणेश पाटील, योगेश ठाकरे, पंढरीनाथ पाटील, दिनकर सोनवणे, अविनाश कोळी, व शेतकरी उपस्थित होते. बिनविरोध संचालक पुढील प्रमाणे तापीराम पाटील, गणेश कोळी, शालिग्राम पाटील, मकुंदा पाटील, योगेश पाटील, ज्ञानेश्वर पाटील, नंदलाल पाटील, अरूण पाटील, रघुनाथ सोनवणे, रेखा पाटील, अरूणा भोई हे देखील यावेळी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेचे खत विभाग प्रमुख प्रकाश पाटील व शिपाई संजय जगताप यांनी प्रयत्न केले. सुत्रसंचलन नगराज पाटील यांनी केले तर उपस्थितांचे आभार सचिव विकास पाटील यांनी मानले.

 

Exit mobile version