Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कुपोषण मुक्ती प्रबोधनासाठी पाच कीर्तनकारांची निवड

kirtankar

मुक्ताईनगर प्रतिनिधी । श्री संत आदिशक्ती मुक्ताबाईच्या पालखी सोहळा दरम्यान मुक्काम दर मुक्कामाला राजमाता जिजाऊ माता संगोपन या राज्य शासनाच्या कुपोषणमुक्ती अभियानांतर्गत कुपोषण मुक्तीसाठी प्रबोधनपर कीर्तने करण्याचा शासनाचा मानस असून यासाठी पाच कीर्तनकारांची निवड करण्यात आली. याकरिता दिनांक 15 मे रोजी औरंगाबाद येथे हॉटेल लेमन ट्री मध्ये विशेष कार्यशाळा राजमाता जिजाऊ मिशनच्या सुप्रभा अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.

औरंगाबाद येथे राजमाता जिजाऊ माता संगोपन बाल आरोग्य व पोषण मिशन या महाराष्ट्र शासनाच्या विभागांतर्गत राज्यातील कीर्तनकारांची विशेष कार्यशाळा घेण्यात आली मिशनच्या सुप्रभा अग्रवाल डॉक्टर सुदाम युनिसेफचे सल्लागार अशोक उतरान यांच्या प्रमुख उपस्थितीत ही कार्यशाळा पार पडली या कार्यशाळेत नाशिक जळगाव परभणी अकोला औरंगाबाद जिल्ह्यातील कीर्तनकार उपस्थित होते.

दरवर्षी आषाढी वारीला एकादशीनिमित्त विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने पायी दिंडी सोहळ्यात पंढरपूरकडे मार्गस्थ होतात यादरम्यान वारकऱ्यांना द्वारा स्वच्छता अभियान वृक्षारोपण व संगोपन असेच उपक्रम राबवून विशेष कामगिरी केली जाते याच अनुषंगाने देशाला भेडसावणारा उपोषणाचा समोर नायनाट व्हावा याकरिता राज्य शासनामार्फत वारकरी धागा पकडून कीर्तनकारांच्या माध्यमातून कुपोषणमुक्तीचा प्रचार व प्रसार व्हावा या उद्देशाने राजमाता जिजाऊ माता संगोपन बाल आरोग्य व पोषण मिशन अभियान राबवण्यात येणार आहे याकरिता आजची तीन तासांची कार्यशाळा होत असल्याचे प्रतिपादन यांच्या प्रमुख सुप्रभा अग्रवाल यांनी केले.

श्री संत मुक्ताई पालखी सोहळ्यात कुपोषण मुक्ती वर प्रबोधनासाठी अखिल भारतीय वारकरी मंडळाचे खानदेशी विभागीय अध्यक्ष हभप भाऊराव महाराज पाटील, अखिल भारतीय वारकरी मंडळ महिला आघाडी जिल्हाध्यक्ष हभप दुर्गा संतोष मराठे, बुर्‍हाणपूर येथील कीर्तनकार हभप मालती महाजन महाराज, मुक्ताईनगरचे हभप भागवत महाराज कदम, हभप प्रा.सी.एस. पाटील या कीर्तनकारांची नियुक्ती औरंगाबाद येथील कार्यशाळेत करण्यात आली आहे.

Exit mobile version