Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कुमारस्वामी विश्वासदर्शक ठराव मांडण्यास तयार

hd kumaraswamy 1562695354

बेंगळुरू, वृत्तसंस्था | सर्वोच्च न्यायालयाने कर्नाटकातील राजकीय परिस्थिती मंगळवारपर्यंत ‘जैसे थे’ ठेवण्याचे आदेश दिलेले असतानाच मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडण्यास तयार असल्याची घोषणा केली आहे. विश्वासदर्शक ठराव मांडण्यासाठी कुमारस्वामी यांनी विधानसभा अध्यक्षांना वेळही मागितली आहे.

 

कर्नाटकातील बंडखोर आमदारांनी दिलेले राजीनामे आणि या आमदारांना अपात्र ठरविण्याबाबत विधानसभा अध्यक्षांकडे आलेली याचिका याचा वाद सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाने मंगळवारपर्यंत कर्नाटकची राजकीय परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश विधानसभा अध्यक्षांना दिले आहेत. त्यामुळे या आमदारांचे राजीनामे लटकले आहेत. या संधीचा राजकीय लाभ उठवण्यासाठी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी कंबर कसली असून आपण विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडण्यास तयार असल्याचं म्हटलं आहे. सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता तुम्ही मला वेळ आणि परवानगी द्यावी, मी माझं बहुमत सिद्ध करतो, अशी विनंतीच त्यांनी विधानसभा अध्यक्षांना केली आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेतात, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.
कर्नाटक विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. मात्र या अधिवेशनावर राजकीय संकटाचे सावट आहे. काँग्रेस, जेडीएस आणि अपक्ष मिळून एकूण १६ आमदारांनी त्यांचे राजीनामे सादर केल्याने कुमारस्वामी सरकार संकटात सापडले आहे.

कर्नाटकातले राजकीय बलाबल :-
एकूण आमदार : २२४
जेडीएस: ३७
काँग्रेस: ७९
बसपा : ०१
भाजप : १०५
अपक्ष : ०२

Exit mobile version