Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

उन्नाव बलात्कार प्रकरणात कुलदीप सेंगर दोषी

Kuldeep Sanger guilty in Unnao rape case

 

दिल्ली वृत्तसंस्था । उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपी माजी भाजप आमदार कुलदीप सैंगरला दिल्लीच्या तीस हजारी कोर्टाने दोषी जाहीर केले आहे. या खटल्यातील पुढील सुनावणी दि.१९ डिसेंबर रोजी होणार आहे.

उन्नाव येथे २०१७मध्ये एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता. आमदार कुलदीपसिंग सेंगर याच्यावर या बलात्काराचा व अपहरणाचा आरोप होता. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार हा खटला लखनऊ येथील न्यायालयातून दिल्ली न्यायालयात वर्ग करण्यात आला होता. ५ ऑगस्टपासून या खटल्याची दैनंदिन सुनावणी होत आहे. या प्रकरणी सेंगर व सहआरोपी शशी सिंग याच्याविरोधात गुन्हेगारी कट रचणे, अपहरण, बलात्कार आदींशी संबंधित कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले होते. आज कोर्टाने या प्रकरणी निकाल दिला. कुलदीप सेंगरसह सहआरोपी असणाऱ्या शशी सिंहची कोर्टाने निर्दोष म्हणून मुक्तता केली.

Exit mobile version