Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गोदावरी एमबीए महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

जळगाव प्रतिनिधी । स्त्रियांसाठी साक्षरतेची वाट प्रकाशमान करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची 190वी जयंती आज गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च एमबीए महाविद्यालायत साजरी करण्यात आली.

महाविद्यालयाचे संचालक डॉ. प्रशांत वारके यांनी यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाविषयी माहिती दिली. विद्यार्थ्यांना संबोधताना ते म्हणाले की सावित्रीबाई ह्या धाडसाचा पर्वत होत्या त्यांच्या जीवनात खूप संकटे आलीत पण त्यांना न डगमगता सर्व संकटांना निर्धाराने हरविले. स्त्रीने ठरविले तर तिच्यासाठी काहीही शक्य नाही याचे उदाहरण म्हणजे सावित्रीमाई फुले होय. सत्यशोधक समाजाचे कार्य त्यांनी आपल्या अंतापर्यंत सुरू ठेवले. सावित्रीबाईंचा त्याग व धैर्यामुळे आजच्या महिलेला समाजात मानाचे व प्रतिष्ठेचे स्थान प्राप्त झाले आहे. शिक्षणाशिवाय मनुष्याचा विकास नाही. मनुष्य हा त्याच्या कार्याने मोठा होतो. म्हणून चांगले विचार ठेवून चांगले काम करा. आपल्या कामासोबत नेहमी प्रामाणिक रहा कोण काय बोलेल याचा विचार करू नका. विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांचे, गुरुजनांचे नेहमी ऐकले पाहिजे. आज 5 वर्षांपर्यंत तुम्ही मेहनत घेतली की तुम्हाला पुढे काहीही त्रास होणार नाही.

महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉ. अनुभूती शिंदे यांनीही यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याविषयी माहिती दिली.

यावेळी BCA ची विद्यार्थ्यांनी भूमिका नाले हिनेआपले मनोगत व्यक्त केले. यावेळी BBA, BCA, MBA च्या शाखेचे विद्यार्थी कार्यक्रमास उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदित्य पाटील याने केले.

यावेळी महाविद्यालयाचे डॉ. नीलिमा वारके, प्रा. मकरंद गोडबोले, प्रा. प्राजक्ता पाटील, प्रा. चेतन सरोदे, डॉ. अनुभूती शिंदे, प्रा. भाग्यश्री पाटील, प्रा. आफ्रिन खान, प्रा. अश्विनी सोनवणे, प्रा. श्रुतिका नेवे, प्रा.चारुशीला चौधरी, प्रा. मिताली शिंदे, प्रा. प्रिया फालक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Exit mobile version