Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाचोरा येथे क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती उत्साहात साजरी

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित. श्री. गो. से. हायस्कूल येथे आज बुधवार, दि. ३ ऑगस्ट रोजी क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आली. इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत सहभाग घेऊन क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला व स्वातंत्र्य चळवळीत त्यांचे योगदान किती महत्त्वाचे होते हे मांडले.

याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका प्रमिला वाघ, पर्यवेक्षक आर .एल. पाटील, एन .आर. ठाकरे, ए. बी. अहिरे, सांस्कृतिक विभाग प्रमुख आर. बी. तडवी, एस. एन. पाटील, शितल महाजन, अंजली गोहिल, अरुण कुमावत, सुबोध कांतायन, एस. एस. पाटील उपस्थित होते. विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका सी. एल .जाधव यांनी वक्तृत्व स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी सहकार्य केले.

Exit mobile version