Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोतवाल यांना चतुर्थ श्रेणी व किमान वेतन मिळावे

 

पारोळा, प्रतिनिधी । पारोळा तालुका कोतवाल संघटनेतर्फे माजी मंत्री तथा राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष डॉ. सतीश पाटील यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

तालुक्यातील कोतवालांना चतुर्थ श्रेणी लवकरात लवकर बहाल करण्यात यावी,किमान सरसकट रुपये १५००० रुपये वेतन मंजुर करण्यात यावे तसेच पदवीधर कोतवाल यांना तलाठी व तत्सम पदात ५० % आरक्षण देण्यात यावे यामागणीचे निवेदनात म्हटले आहे. मागच्या सरकारने अत्यंत तुटपुंजी म्हणजे ७५०० रुपये एवढी वाढ केली आहे. ५० वर्षावरील कोतवालांना रुपये १५००० अशी तफावत करून अन्याय केला. मानधनी सर्व कर्मचाऱ्यांना समान असा पगार असतो, परंतु दुर्दैवी म्हणून फक्त कोतवालांना याचा सामना करावा लागत आहे. आम्हाला कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी किमान वेतन मंजूर करून किंवा सरसकट १५ हजार पगार मंजूर करून देण्यात यावे.

पदवीधर कोतवालांना तलाठी पदात आणि तत्सम पदार्थ ५० टक्के आरक्षण देण्यात यावे. ग्रामपंचायत कर्मचारी यांना किमान वेतन मंजूर करण्यात आले आहे. त्याच प्रमाणे आपण सुद्धा कोतवालांना किमान वेतन मंजूर करून द्यावे आणि चतुर्थ श्रेणी मिळेल यासाठी प्रयत्न करावा याबाबत महसूल मंत्री व मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून संघटनेची चतुर्थश्रेणी ची मागणी व तलाठी पदासाठी ५० टक्के आरक्षण देण्याबाबत शिफारस करून न्याय मिळवून द्यावा अशी विनंती पारोळा तालुका कोतवाल संघटनेच्या वतीने डॉ. सतीश पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदन माजी आमदार डॉ. सतीश पाटिल यांचे प्रतिनिधी डी. के. पाटिल यांनी स्विकारले.निवेदन देतेवेळी पारोळा तालुका कोतवाल संघाचे अध्यक्ष अनिल पाटील, उपाध्यक्ष विलास पाटील, चिटणीस नाना वानखेडे,कोतवाल एकनाथ पाटिल,गुलाब जोगी आदी उपस्थित होते.

Exit mobile version