Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोष्टी महिलाचा स्तुत्य उपक्रम : एक राखी सैनिकांच्या सन्मानासाठी ..!

सावदा ता. रावेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बहिण भावाच्या अतूट प्रेमाचे प्रतिक असलेल्या रक्षाबंधन सणानिमित्त दि. ४ ते ६ ऑगस्टपर्यंत “एक राखी सैनिकांच्या सन्मानासाठी ” हा उपक्रम राबवण्यात आला असून हजारो आकर्षक राख्या बनविन्यात आल्या.

यामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील देशाच्या सीमेवरील जवानांन करीता अमृत महोत्सवाचे आवचित्त्य साधून कोष्टी वाड्यातील सौ नेत्रा गणेश कोष्टी , सौ . प्रणाली नितीन कुमार काटे ,स्वाती गौरव कोष्टी यांचे सह कोष्टी वाड्या सह परिसरातील महिलावर्गाने एकत्रितपणे रक्षाबंधन हा सण देशाच्या रक्षण रक्षणासाठी सदैव तत्पर असणाऱ्या तसेच ऊन, वारा, पाऊस, हिवाळा ,उन्हाळा कोणत्याही गोष्टीची तमा न बाळगता प्राणहातावर घेऊन आपल्याला घरा घरात सुखाची झोप देणाऱ्या अश्या सीमेवरील आमचे “भाऊ ” जवानांसोबत साजरा करण्याचे ठरवले आहे.

यासाठी ६ ऑगस्ट पर्यंत एकत्रितपणे जमा केलेल्या रक्कमेमधून जम्मू आणि काश्मिर, कारगिल, उत्तर प्रदेश व अरुणाचल प्रदेश येथील सीमेवरील जवानांसाठी 100-100 राख्या Speed Post द्वारे पाठवल्या आहेत. भारतात साजरा होणाऱ्या विविध सण उत्सवात आपल्या सीमेवरील सैनिकांना सहभागी होता येत नाही. सैनिक निस्वार्थपणे आपल्या परिवाराची काळजी न करता देशहितासाठी अहोरात्र डोळ्यात तेल घालून सदैव तत्पर असतात. म्हणून महाराष्ट्रातील महिला वर्गाने रक्षाबंधन हा सण सैनिकांच्या या निस्वार्थ सेवेला सन्मान देण्याचा एक छोटासा प्रयत्न म्हणून त्यांच्यासोबत करण्याचे ठरवले आहे.

या उपक्रमात विशेषतःनेत्रा गणेश कोष्टी, स्वाती अभिजित कोष्टी, प्राध्यापिका प्रणाली कोष्टी ( काटे ), नेहा संजय बन्नापुरे, याच्या सह वैशाली कोष्टी, लता कोष्टी, सुनीता कोष्टी, उर्मिला गरडे, मनीषा  कोष्टी, वैशाली नारळे, अपेक्षा कोष्टी, योगिता कोष्टी, रुपाली बावणे, ज्योती सरोदे यांनी परिश्रम घेतले.

 

 

Exit mobile version