Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दिल्लीत भाजपच्या कोरोनाचा सत्ताधारी आपला संसर्ग !

नवी दिल्ली वृत्तसंस्था । दिल्लीत कोरोना रुग्णांची संख्या वाढलेली आहे . दरम्यान दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांना पत्र लिहून कोरोना चाचण्या वाढवण्यात येऊ नयेत यासाठी दिल्ली सरकारच्या आरोग्य खात्यातील अधिकाऱ्यांवर दबाव टाकला जात असल्याचा आरोप जैन यांनी केला आहे.

दिल्लीमध्ये चाचण्या रोखण्याचा आरोपही सत्येंद्र जैन यांनी गृह मंत्रालयावर केलाय. ‘अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, गृह मंत्रालयाकडून दिल्लीच्या अधिकाऱ्यांवर दिल्लीत चाचणी आणखी वाढवल्या जाऊ नयेत यासाठी दबाव टाकण्यात येतोय’ असं जैन यांनी म्हटलंय.

दिल्लीत लोकनियुक्त सरकार आहे आणि हे सरकार निर्णय घेण्यात सक्षम आहे. दिल्लीत करोना चाचण्या करण्यासाठी अरविंद केजरीवाल सरकारला का रोखलं जातंय? असा प्रश्न विचारत दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी गृह सचिव अजय भल्ला यांना थेट विचारला आहे. दिल्लीच्या अधिकाऱ्यांवर या पद्धतीनं बेकायदेशीर दबाव का टाकला जातोय? तुम्हाला विनंती करतो की अशा पद्धतीचा दबाव टाकला जाऊ नये, असं जैन यांनी पत्रात लिहिलंय.

दिल्ली सरकार दिल्लीमध्ये चाचण्यांची संख्या वाढवत आहे. केंद्र सरकारनं यात हस्तक्षेप करण्याची गरज नाही. मी हे पत्र गृहमंत्री अमित शहा यांना लिहिणार होतो, परंतु त्यांची तब्येत बरी नसल्यानं आणि ते एम्समध्ये दाखल असल्यानं मी हे पत्र तुम्हाला लिहितोय, असंही आरोग्यमंत्र्यांनी गृह सचिवांना उद्देशून म्हटलंय.

दिल्लीमध्ये वाढत्या संक्रमणादरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी २६ ऑगस्ट रोजी अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत प्रत्येक दिवशी होणाऱ्या २०,००० टेस्ट वाढवून ४०,००० हजारांपर्यंत नेण्याचा आदेश दिलाय.

Exit mobile version