Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोंबींग ऑपरेशनमध्ये २६ नक्षलवाद्यांचा खात्मा : मिलींद तेलतुंबडेच्याही मृत्यूची शक्यता

गडचिरोली | पोलिसांनी आज राबविलेल्या कोंबींग ऑपरेशनमध्ये मोठे यश मिळाले असून यात १६ नक्षलवाद्यांचा खात्मा झाला आहे. लक्षणीय बाब म्हणजे यात माओवादी नेता मिलींद तेलतुंबडेचाही समावेश असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

 

आज  सकाळी धानोरा तालुक्यातील मुरूम गाव परिसरातील मर्दिनटोलाच्या जंगलात नक्षलविरोधी पोलीस पथक गस्तीवर होते. यावेळी या भागात मोठ्या संख्येने नक्षलवादी लपून बसल्याची गुप्त माहिती पोलिसांना समजली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे नक्षलविरोधी पोलीस पथकाने कॉम्बिंग ऑपरेशन केले. या मोहिमेत जवळपास २६ नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले. यामध्ये माओवादी नेता मिलिंद तेलतुंबडेदेखील ठार झाला असल्याची माहिती मिळतेय. या वृत्ताला पोलिसांनी दुजारा दिलेला नाही. मात्र तेलतुंबडे याच्या मृत्यूमुळे नक्षली चळवळ खिळखिळी झाली असून पोलिसांना मोठे यश मिळाले जात आहे.

गेल्या अनेक महिन्यांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात नक्षलविरोधी मोहिमेला यश मिळाले नव्हते. या पार्श्‍वभूमिवर, आजची चकमक ही लक्षणीय मानली जात आहे. तर आजच्या मोहिमेत तीन पोलिस जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.

Exit mobile version