कोळी समाजबांधवांच्या अन्नत्यागाच्या समर्थनार्थ चोपडा ते अमळनेर बाईक रॅली

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील प्रांताधिकारी कार्यालयाच्या समोर कोळी समाजबांधवांच्या सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी आज चोपडा ते अमळनेरच्या दरम्यान भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली.

आज चोपडा ते अमळनेर येथे आदिवासी टोकरे कोळी जमाती तर्फे अमळनेर येथे सुरु असलेल्या अन्नत्याग सत्याग्रहाला समर्थन म्हणून मोठ्या संख्येने बाईक रॅली चे आयोजन करण्यात आले. बाईक रॅली ला चोपडा व अमळनेर तालुक्यातील खेड्यापाड्यातील बांधवानी सहभाग दिला. आदिवासी टोकरे कोळी जमातीच्या संविधानिक हक्क मागणी संदर्भात दि. ८ मे २०२३ पासून प्रांत कार्यालय अमळनेर समोर जगन्नाथ बापू बाविस्कर यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

त्या उपोषणाला समर्थन म्हणून महाराष्ट्र राज्याचे आदिवासी कोळी जमातीचे अभ्यासक व युवा संघटक शुभम सोनवणे, ऍड. गणेश सोनवणे व समाजाचे सर्व सन्माननीय जमात बांधव यांच्या वतीने प्रांत कार्यालयाला कायदेशीर बाजू मांडण्याकरिता निवेदन अर्ज टपाल विभागात दाखल करण्यात आला. तसेच सदर निवेदन अर्जाच्या प्रति मा.विभागीय आयुक्त, नाशिक, मा.राज्य लोकसेवा हक्क आयुक्त नाशिक, जिल्हाधिकारी जळगाव यांचे कार्यालयाला प्रति दाखल करणार असल्याचे कळविले. तालुक्यातुन बाईक रॅली ला खूप प्रतिसाद मिळाला व आद्यकवी महर्षी वाल्मिकींचा व भारतीय संविधानाचा जयघोष करत रॅली अमळनेर शहरात उपोषण स्थळी पोहोचली.

Protected Content