Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोकीळा पाटील व सुरेश पाटील कॉग्रेस पक्षात करणार प्रवेश

रावेर प्रतिनिधी । भाजपाचे माजी जिल्हा परिषद सदस्या कोकीळा पाटील यांच्यासह भाजपचे माजी तालुकाध्यक्ष सुरेश पाटील हे कॉग्रेस पक्षात प्रवेश करणार आहे. यामुळे शहरात चर्चेला उधाण आले आहे. माजी भाजपा तालुकाध्यक्ष सुरेश चिंधु पाटील हे आधी कॉग्रेस मधून राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये आले होते. त्यानंतर त्यांनी बहुजन समाज पार्टीमध्ये प्रवेश करून २००९ ची लोकसभा निवडणुक लढली होती. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांची पत्नी कोकीळा पाटील या २०१२ मध्ये भाजपा कडून जिल्हा परिषदेवर निवडून गेल्या होत्या तर सुरेश पाटील यांनी भाजपाचे रावेर तालुकाध्यक्ष म्हणून देखील काम पाहीले आहे. मागील अनेक वर्षा पासून सुरेश चिंधु पाटील यांच्या मनात खदखद आहे. कॉग्रेस प्रदेशध्यक्षाच्या उपस्थित आम्ही पती-पत्नी व माझ्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते कॉग्रेस जॉइन करणार आहे. आगामी वर्ष भरात तालुक्यात अनेक महत्वाच्या संस्थेच्या निवडणुका आहे.

Exit mobile version