Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

प्रकाशझोतातील कसोटी सामने खेळण्यास कोहली तयार – गांगुली

sourav ganguly

 

कोलकाता वृत्तसंस्था । प्रकाशझोतातील कसोटी सामने खेळण्यासाठी भारताचा कर्णधार विराट कोहली तयार असल्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुलीने सांगितले. ‘बीसीसीआय’च्या मुख्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते.

‘बीसीसीआय’च्या मुख्यालयात कोहलीशी झालेल्या बैठकीबाबत गांगुली म्हणाला, प्रकाशझोतामधील कसोटी सामने खेळण्यास कोहली तयार नाही, अशा प्रकारची चर्चा होत होती. परंतू यात तथ्य नाही. कसोटी क्रिकेटला पुढे जाण्यासाठी ते आवश्यक आहे. याबाबत आमचे एकमत झाले आहे. ईडन गार्डन्स स्टेडियमवर बंगाल क्रिकेट संघटनेकडून झालेल्या विशेष सत्कारानंतर गांगुली म्हणाला, ‘मी दिवस-रात्र स्वरूपाच्या कसोटी सामन्याचा समर्थक आहे. हे प्रत्यक्षात केव्हा होईल, हे मला माहीत नाही. परंतू मी पदावर असेपर्यंत त्याचा पाठपुरावा करीन’.

Exit mobile version