Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जाणून घ्या अंतरिम अर्थसंकल्पाची महत्वाची वैशिष्टये

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज २०२४-२५ या वर्षाचे अंतरिम अर्थसंकल्प विधानसभेत सादर केले. या वर्षी एकूण खर्चासाठी 6 लाख 522 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. महसूली जमा खर्चात 4 लाख ९८ हजार ७५८ कोटी रूपये आणि ५ लाख ८ हजार ४९२ कोटी रूपये महसूली खर्च दाखवण्यात आलेला आहे. ९ हजार ७३४ कोटी रूपये महसूली तूट, तर राजकोषीय तूट ९९ हजार २८८ कोटी रूपयांचे अंदाज करण्यात आले आहे. या अर्थसंकल्पात चार महिन्यांचे लेखानुदान मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहे.

या वर्षीच्या अर्थसंकल्पात कार्यक्रम खर्चाकरिता नियोजन विभागास ९ हजार १९३ कोटी रूपये, मराठी विभागसाठी ७१ कोटी रूपये, रोजगार हमी योजनेसाठी २ हजार २०५ कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहे. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गंत १८ हजार १६५ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. अनुसूचित जाती उपयोजनेसाठी १५ हजार ८९३ कोटी रूपये, राज्याच्या वार्षिक योजनेसाठी १ लाख ९२ हजार कोटी तर आदिवासी विकास उपयोजनेसाठी १५ हजार ३६० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. या अंतरिम अर्थसंकल्पाची ठळक वैशिष्टये खाली दिलेली आहे.

Exit mobile version