Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जाणून घ्या बजट 2024 बद्दल थोडक्यात

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा ।  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अंतरिम बजेटमध्ये महत्वाच्या घोषणा केल्या. अंतरिम अर्थसंकल्प असल्याने त्यात मोठ्या घोषणा आणि निर्णय घेण्यात येत नाही. मोदी सरकारने या परंपरांचे पालन केले. या बजेटमध्ये मोठ्या घोषणा झाल्या नाहीत. या बजेटमधील 10 महत्त्वाच्या घोषणा संक्षिप्त जाणून घ्या.

3 कोटी महिला होणार लखपती दीदी – देशात सध्या एक कोटी महिला लखपती झाल्याचे त्यांनी सांगितले. भाजप शासित राज्यांमध्ये ही योजना लोकप्रिय ठरली आहे. आता या योजनेतंर्गत देशात 3 कोटी महिलांना लखपती दीदी योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. दोन कोटी घरे बांधणार – पंतप्रधान आवास योजननेअंतर्गत येत्या पाच वर्षात ग्रामीण भागात दोन कोटी घरे बांधण्यात येणार असल्याची घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली. 300 यूनिट वीज मोफत देण्याची महत्त्वाची घोषणाही निर्मला सीतारामन यांनी केली आहे.

आशा सेविका, अंगणवाडी सेविकांना गिफ्ट – आशा वर्कर, अंगणवाडी सेविकांना आयुष्यमान भारत योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. या योजनेत पाच लाख रुपयांपर्यंतच्या उपचाराची सोय होणार आहे. त्याचा फायदा देशातील अंगणवाडी आणि आशा सेविकांना मिळेल. रेल्वे कोचबाबत महत्वाची अपडेट – भारतीय रेल्वेचे 40 हजार नॉर्मल रेल्वे कोच वंदे भारत ट्रेनमध्ये बदलण्यात येणार आहे.

वंदे भारत ट्रेन सध्या लोकप्रिय आहे आणि तिला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. तर पीएम गती शक्ती उपक्रमातंर्गत या कॉरिडॉरची बांधणी करण्यात येणार आहे. हाय ट्रॅफिक कॉरिडॉरमुळे प्रवासी ट्रेन्सच संचालन अधिक गतीने आणि सुरक्षितपणे होईल. सेमी हाय-स्पीड ट्रेन्सची संख्या आणखी वाढवली जाईल.

देशातील शहरांमध्ये मेट्रोचे जाळे उभारण्यावर भर देण्यात येत आहे. विमानतळाची संख्या होणार दुप्पट – विमान वाहतूक क्षेत्राचा कायापालट होईल. दहा वर्षांत विमानतळांची संख्या दुप्पट होईल. नवीन 149 विमानतळ उभारण्यात येणार आहे. टिअर 2, टिअर 3 शहरांमध्ये उड्डाण योजना राबविण्यावर भर, 517 नवीन मार्ग आणि 1.3 कोटी प्रवाशी असल्याची आकडेवारी समोर आली आहे. शेतकऱ्यांसाठी मदत – अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रावर पण भर देण्यात आला आहे.

दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वसामावेशक कार्यक्रम आखला जाणार आहे. पीएम किसान योजनेतून 11.8 कोटी शेतकऱ्यांना सरकारी मदत देण्यात आली आहे. तर 4 कोटी शेतकऱ्यांना पीकविम्याचे कवच देण्यात आले आहे. टॅक्स स्लॅबमध्ये नाही बदल – या अंतरिम अर्थसंकल्पात अपेक्षेप्रमाणे कर रचनेसंदर्भात कोणताच बदल झालेला नाही. नव्या कर रचनेनुसार सात लाखांपर्यंतचे उत्पन्न असणाऱ्या करदात्यांना कोणताही कर भरावा लागणार नाही.

करपात्र उत्पन्नात तीन टक्क्यांची वाढ झाली आहे. रिटर्न फाईल करणाऱ्या करदात्यांची संख्या 2.4 टक्क्यांनी वाढली आहे. कृषी क्षेत्राशी संबंधित या योजना – देशातील 1361 बाजार समित्या eName शी जोडण्यात येणार आहे. येत्या पाच वर्षात त्यांच्या विकासासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. मिशन इंद्रधनुष्य – मिशन इंद्रधनुष्य अंतर्गत टीकाकारणावर भर देण्यात येणार आहे. नवीन मेडिकल कॉलेज उघडण्यात येणार आहे.

गर्भाशयाचा कँसर रोखण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. या पण घोषणा – आदिवासी समाजाच्या विकासावर भर देण्यात येईल. पायाभूत सुविधांवर भर देण्यात येईल. गरिबी हटाव मोहिमेवर भर देणार आहे. प्रत्येक घरी पाणी योजनेवर भर देण्यात येणार आहे. 78 लाख फेरीवाल्यांना मदत करण्यात आली आहे. 54 लाख तरुणांना प्रशिक्षित करण्यात आले आहे.

Exit mobile version