Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मागील भांडणाच्या कारणावरून एकावर चाकूहल्ला

जळगाव प्रतिनिधी । मागील भांडणाच्या कारणावरून एक तरूणाला वार चाकू हल्ला करून जखमी केल्याची घटना खेडी रिक्षा स्टॉपजवळ घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सविस्तर माहिती अशी की, भावेश पोपट पाटील (वय-२४) रा. खेडी बुद्रुक ता.जि.जळगाव हा आपल्या कुटुंबियांसह राहतो. दोन महिन्यांपुर्वी गाडीवर पाणी उडाल्याच्या कारणावरून धनराज गजानन कोळी यांच्याशी भांडण झाले होते. याचा राग मनात ठेवून धनराज कोळी आणि त्याचा मित्र योगेश पंडीत सुर्यवंशी दोन्ही रा. खेडी बुद्रुक ता.जि.जळगाव यांनी ३० जुलै रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास भावेश पाटील हा दुचाकीने घरी जात असतांना गावातील रिक्षा स्टॉपजवळ अडवून त्यांच्या डोक्याला फायटरने तर पोटावर व मांडीवर चाकूने वार करून गंभीर जखमी केले. भावेशला खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी भावेशच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Exit mobile version