Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

‘या’ गंभीर कारणावरून महिलेवर केला चाकूहल्ला !

सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दोन वर्षांपासून ओळख असतांना बोलत नाही आणि शरीरसंबध ठेवून देत नाही या गंभीर कारणावरून महिलेला धारदार वस्तूने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एकावर सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, रावेर तालुक्यातील एका गावात ४० वर्षीय महिला ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. सिध्दार्थ बळीराम भालेराव (वय-३६) याची महिलेशी ओळख होती. दोन वर्षांपासून सदरील महिलेने सिध्दार्थ सोबत बोलणे बंद केले होते. याचा राग मनात ठेवून ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता शेतात काम करत असतांना संशयित आरोपी सिध्दार्थ भालेराव हा तिच्याजवळ आला. तु माझ्याशी का बोलत नाही माझ्याशी शरीरसंबंध का ठेवत नाही असे बोलून धारदार वस्तून वार करून तिला गंभीर जखमी केले. तसेच भांडण सोडवासोडव करणाऱ्या इतर दोन जणांना देखील मारहाण केली. हा प्रकार घडल्यानंतर तातडीने महिलेने पोलीसात धाव घेतली. याप्रकरणी संशयित आरोपी सिध्दार्थ भालेराव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शांताराम पाटील करीत आहे.

Exit mobile version