Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आता मुंबईत भरीताची वांगी पहिल्यांदा शोधावी लागतील !-निंबाळकर (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । जळगावातील कार्यकाळात येथील नागरिकांचा आपल्याला खूप स्नेह मिळाल्याचे सांगत आता मुंबईत भरीताची वांगी पहिल्यांदा शोधावी लागतील, अशा शब्दात माजी जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी जळगाव आपल्या हृदयात कायम राहणार असल्याचे सांगितले.

माजी जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर हे महसूल व वन विभागाच्या अपर मुख्य सचिवपदी (मदत व पुनर्वसन) पदावर लवकरच रुजू होणार आहेत. यांनी पु.ना. गाडगीळ कलादालनातील कार्यक्रमात लाईव्ह ट्रेंडस् न्यूजला विशेष मुलाखत दिली. यात ते म्हणाले की, जळगावातील दोन वर्षाचा काळ सुखद होता जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असताना केवळ एकाच गोष्टीवर भर न देता सर्वच विषयांवर भर देता आला.

अतिक्रमण, महानगरपालिका, पाणी पुरवठा, मनरेगा आदी प्रश्‍न चांगल्या प्रकारे सोडवता आले. जळगावकरांचे प्रेम विसरु शकत नाही. खान्देश म्हटले की भरीत, शेवभाजी, दाळगंडोरी आदीचा मस्त स्वाद घेता आला. त्या सोबत नाचणीचे पापड, कुरडया आदी पुढील पाच वर्ष टिकतील इतक्या जळगावकरांनी दिल्या. असोदा येथील किशोर चौधरी या मित्राच्या आईच्या हातचे लोणचे. भाज्या खान्देशची आठवण सतत ताजी ठेवतील. यामुळे आता मुंबई येथे पहिल्यांदा भरीताची वांगी पहिल्यांदा शोधावी लागतील अशी खान्देशच्या पाहुणचाराला दाद देणारी प्रतिक्रिया निंबाळकर यांनी व्यक्त केली.

पहा– खान्देशी खाद्यसंस्कृतीला दाद देणारी किशोरराजे निंबाळकर यांची प्रतिक्रिया.

Exit mobile version