Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

किशोर बाविस्कर यांना भारत भूषण पुरस्कारासह ग्लोबल टीचिंग एक्सलन्स अवॉर्ड जाहीर

यावल प्रतिनिधी । येथील शिव समर्थ माध्यमिक विद्यालयातील अष्टपैलू कलावंत किशोर बाविस्कर यांना नॅशनल अँटी हरीश मेंट फाउंडेशन मध्यप्रदेश इंदोर (दि.17 जुलै 2021) आयोजित भारत भूषण पुरस्कार 2021 व काईट क्राफ्टप्रोडक्शन लुधियाना पंजाब ग्लोबल टिचिंग एक्सलन्स पुरस्कार 2021 नुकताच जाहीर झाला आहे.

किशोर बाविस्कर यांची ठाणे ही कर्मभूमी असून जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातून गोरगावले हे त्यांचे मूळ गाव आपल्या कलेच्या जोरावर सतत त्यांनी कलाक्षेत्रातील नाविन्यपूर्ण अविष्कार निर्माण करून युवा पिढीतील अष्टपैलू कलावंत म्हणून ओळख निर्माण केली आहे.

किशोर बाविस्कर सरांचे शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल राज्य व राष्ट्रीय पातळीवर त्यांच्या गौरव वेळोवेळी शासनाने केला आहे त्यांचे सामाजिक क्षेत्रातील कार्य म्हणजे महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघ ठाणे ठाणे येथील उपाध्यक्ष पदावर कार्यरत असून कला क्षेत्रातील विद्यार्थ्यांना न्याय मिळण्यासाठी स्वतः शासन दरबारी झटत असतात एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षा तील विद्यार्थ्यांना मोफत अध्ययन करून एक मोठे सामाजिक कार्य करत असतात.

 कला शिबिर भित्तीचित्र स्पर्धा ते सतत मुलांना सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहन देत असतात दि.27 फेब्रुवारी 20 21  रोजी त्यांनी मराठी दिनाचे औचित्य साधून कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त मराठी भाषेतील व्यंजनांचे  चे विविध रूपे साधून दोनशे कलाकृती करण्याचा बहुमान श्री बाविस्कर सरांनी केला आहे तसेच भारत व रेकॉर्ड करून खानदेश भूमीचे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यात बहुमान श्री बाविस्कर सर यांनी केला आहे.

 

Exit mobile version