Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोळी समाज संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी किशोर सोनवणे

koli samaj niyuktipatra

चाळीसगाव प्रतिनिधी । अखील भारतीय कोळी समाज संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी येथील किशोर सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली.

दिल्ली येथे नोंदणीकृत असणार्‍या अखील भारतीय कोळी समाज संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी येथील किशोर सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीचे पत्र त्यांना नुकतेच प्रदान करण्यात आले. याप्रसंगी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिनेश प्रभाकर सोनवणे, राज्य सचिव अ‍ॅड. वसंत भोलाणकर, धुळे जिल्हाध्यक्ष प्रदीप नवसारे, राष्ट्रीय कार्यकारीणी सदस्य गणेश सोनवणे, अनिल ननावरे, धनराज साळुंखे ,नवनाथ सोनवणे, राजेंद्र मोरे, दीपक मोरे, कुणाल झोडगे आदी समाजबांधव उपस्थित होते.

Exit mobile version