युवक माळी महासंघाच्या जिल्हा अध्यक्षपदी किशोर माळी

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | येथील माळी समाजाचे युवा समाजसेवक किशोर माळी यांची माळी महासंघाच्या जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

यावल येथील शुक्रवार, दि २७ मे रोजी संपन्न झालेल्या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश ठाकरे, प्रदेशाध्यक्ष अरुणराव तिखे, विश्वस्त कैलास  माळी, जिल्हाध्यक्ष कृष्णा माळी यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देवून किशोर माळी यांची माळी महासंघाच्या जळगाव जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे .

त्यांची निवड झाल्याबद्दल समाज बांधवांच्या वतीने सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी स्वागत केले आहे. विविध सामाजिक कार्याची दखल घेत माळी यांची निवड करण्यात आली आहे.

या निवडीबद्दल माळी समाज, यावल तालुका, शहर, शिवरत्न फाउंडेशन, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, तेजस्विनी दुर्गा उत्सव मंडळ, एकदंत गणेश मंडळ, समाजातील, तालुक्यासह जिल्ह्यातील समाज बांधवांनी त्यांचे अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहे.

Protected Content