Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

किशोर चौधरी खून खटल्याचा उद्या निकाल

0court 383

जळगाव प्रतिनिधी । शहरातील चौघुले प्लॉट परिसरातील किशोर चौधरी खून खटल्यातील आरोपींना उद्या शिक्षा सुनावण्यात येणार आहे.

याबाबत वृत्त असे की, शहरातील चौघुले प्लॉट परिसरातील रहिवासी किशोर मोतीलाल चौधरी यांच्यावर जमावाने हल्ला करून त्यांचा खून केला होता. या प्रकरणी सुरेश दत्तात्रय सोनवणे, उमेश धनराज कांडेलकर, रमाबाई सुरेश सोनवणे, वैशाली उमेश कांडेलकर, रंजनाबाई भगवान कोळी, योगीता गणेश सपकाळे, सखूबाई विश्‍वास सपकाळे, सागर जगन्नाथ सपकाळे, ज्ञानेश्‍वर भीवसन ताडे उर्फ नाना मराठे, गणेश विश्‍वास सपकाळे (कोळी), अंजना किशोर कोळी, भगवान बाबूराव कोळी आणि किशोर अनिल कोळी यांच्या विरूध्द शनीपेठ पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला होता. या खटल्यात सरकारतर्फे १४ तर बचाव पक्षातर्फे ४ असे एकूण १८ साक्षीदार तपासण्यात आले होते. यातील गणेश सपकाळेला जामीन मिळाला होता. तर अन्य संशयित आजपर्यंत कारागृहात होते.

आज दुपारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश जी.ए. सानप यांनी या खटल्याचा निकाल उद्या सकाळी वाचण्यात येणार असल्याचे जाहीर केले.

Exit mobile version