किसान सन्मान योजनेस प्रारंभ

गोरखपूर वृत्तसंस्था । केंद्र सरकारच्या किसान सन्मान योजनेस आजपासून प्रारंभ करण्यात आला असून या योजनेतील पहिल्या टप्प्यात शेतकर्‍यांच्या खात्यात प्रत्येकी दोन हजार रूपये जमा झाले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा शुभारंभ झाला. यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले की, शेतकर्‍यांसाठी सुरू करण्यात आलेल्या या योजनेमुळे निवडणुकीसाठी एकत्र येऊन महाभेसळ करणारे विरोधक अस्वस्थ झाले आहेत. या अस्वस्थतेतूनच योजनेबद्दल अफवा पसरवण्याचे उद्योग सुरू आहेत. आता शेतकर्‍यांना २ हजार रुपये दिले जात आहोत. त्यानंतर पुढचा हप्ताही दिला जाईल. मात्र वर्षभरानंतर हे पैसे तुमच्याकडून परत घेतले जातील, अशा अफवा पसरवल्या जात आहेत. या अफवांवर विश्‍वास ठेवू नका. हे पैसे तुमच्या हक्काचे आहेत. मोदी सरकार किंवा कोणत्याच राज्यातलं सरकार हे पैसे परत मागणार नाही. त्यामुळे जे या अफवा पसरवत आहेत, त्यांना खडसावून सत्य सांगा, असे आवाहन मोदी यांनी केले.
दरम्यान, १ कोटी १ लाख शेतकर्‍यांच्या बँक खात्यात या योजनेचा पहिला हप्ता म्हणून प्रत्येकी २ हजार रुपये आज सरकारकडून जमा करण्यात आले. एकूण २ हजार २१ कोटी रुपये आजच ट्रान्सफर करण्यात आल्याचा दावादेखील पंतप्रधान मोदी यांनी केला.

Add Comment

Protected Content