Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

लाल बावटा शेतमजूर युनियन व किसान सभेचा तीव्र आंदोलनाचा इशारा

चोपडा प्रतिनिधी । वीज बील कमी करण्यासह शेतकर्‍यांच्या अन्य मागण्या पूर्ण न झाल्यास लाल बावटा शेतमजूर युनियन व किसान सभेने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

याबाबत वृत्त असे की, महाराष्ट्र सरकारने कोरोना काळात वाढीव वीज बिले पाठवुन जनतेचे कंबरडे मोडले आहे. ती बिले माफ करा आणि लाकडाऊन काळात सरकारने केलेल्या घोषणा नुसार वीस लाख रुपये पैकी शेतकरी शेतमजुरांना १ हजार रुपये प्रत्येकी खर्चाला मिळावेत, तसेच गेल्या वर्षापासून प्रलंबित संजय गांधी श्रावणबाळ इंदिरा गांधी आधी योजनांचे गरजू लोकांनी केलेले अर्ज नुसार मानधन सुरू करावे, शेतकर्‍यांना पिक विमा योजना सहभाग साठी पोळ्यापर्यंत मुदत वाढवून मिळावी; गेल्या मार्च फेब्रुवारी काळात वादळाने केळी बागा उद्ध्वस्त झाल्या त्यांना त्यानुसार पंचनाम्याचे नुसार शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळावी पेट्रोल डिझेल चे भाव फक्त जीएसटी लावून नियंत्रित करावेत. आणि रेशन मधून सरकार तर्फे दिले जाणारे धान्य दर्जेदार व खाण्यायोग्य मिळावे; दूध उत्पादकांना दर वाढवून द्यावेत आणि आणि पशुखाद्य चारा सवलतीच्या दरात मिळावे या मागण्यांसाठी लालबावटा शेतमजूर युनियन व किसान सभा यांनी देशव्यापी संघर्ष सुरू केला आहे.

या अनुषंगाने येत्या १० ते १४ ऑगस्ट काळात महामहीम राष्ट्रपती यांना निवेदन देणे तसेच १ ते ५ सप्टेंबर २०२० काळात शेतकरी शेतमजूर जिल्ह्यातील पन्नास ग्रामपंचायतींच्या समोर उपोषण पोषण आहेत. म्हणून या मागण्यांच्या पाठपुरावा केंद्र सरकारतर्फे केंद्र सरकारकडे करावा या साठी किसान सभा व शेतमजूर युनियन तर्फे तहसीलदार गावित यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

त्यावेळी शेतमजुर नेते नेते कॉम्रेड अमृत महाजन यांच्या नेतृत्वाखाली सुरेश शिंदे, गुलाब शेट्टी, सुमनबाई माळी, शांताराम पारधी, दिलिप धनगर, संजय सोनवणे, शांताराम पाटील, सचिन पोतदार, सरूबाई माळी, कैलास महारु पाटील, विकास कोळी, राजु पारधी, वना माळी, रमेश माळी आदी सहभागी झाले होते.

Exit mobile version