Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

किरीट सोमय्यांच्या अश्‍लील व्हिडीओ क्लिप्स लीक ? : वाहिनीच्या वृत्ताने भूकंप

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या कथित आक्षेपार्ह व्हिडीओ क्लीप्स लीक झाल्याचे वृत्त लोकशाही मराठी या वृत्तवाहिनीने दिल्यामुळे राजकीय वर्तुळाला हादरा बसला असून विरोधकांनी यावरून जोरदार टिकास्त्र सोडले आहे.

आज सायंकाळी लोकशाही मराठी यांची स्पेशल रिपोर्टच्या माध्यमातून भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांचे अश्‍लील व्हिडीओ व्हायरल झाल्याचा दावा करत गौप्यस्फोट केला. यात सोमय्या हे अश्‍लील शब्दांमध्ये चॅटींग करत असल्याचे दर्शविण्यात आले आहे. अशा प्रकारचे अनेक तासांचे चॅटींग उपलब्ध असल्याचा दावा लोकशाही मराठी या वाहिनीने आपल्या वृत्तामध्ये केलेला आहे.

दरम्यान, लोकशाहीच्या या वृत्तामुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडालेली आहे. सोमय्या यांनी भ्रष्टाचार प्रकरणी अनेक नेत्यांवर आरोप केले होते. बर्‍याच नेत्यांना कायदेशीर कारवाईमध्ये अडकवण्यात त्यांचा मोलाचा वाटा मानला जातो. यामुळे आता त्यांच्याच या व्हिडीओ क्लीप लीक झाल्याचा गौप्यस्फोट झाल्याने चर्चेला उधाण आले आहे. या क्लिप खर्‍या आहेत की मॉर्फ केलेल्या ? याबाबत चौकशीतूनच सत्य समोर येणार आहे. तथापि, या वृत्तामुळे राजकीय वर्तुळाला हादरा बसला आहे.

Exit mobile version