Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

किरकोळ वादावरुन हाणामारी

maramari 1

जळगाव प्रतिनिधी | आपापसातील किरकोळ भांडणावरून एकाने चाकूने वार केल्याची घटना आज सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास बी.जे. मार्केटमध्ये गल्लीत हा सर्व प्रकार घडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शकील शहा नसीर शहा वय 55 रा. जोशी पेठ आणि शेख तय्यार शेख अकबर वय 41 रा. बीजे मार्केट जळगाव यांच्यात सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास किरकोळ वाद झाल्याने दोघांमध्ये हाणामारी झाली. यात दोघे जखमी झाले असून दोघांना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. याबाबत अद्याप पर्यंत पोलिसात कुठलीही नोंद करण्यात आलेली नाही.

Exit mobile version