Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ग्रामसभेतून सुटला प्रवेशद्वाराच्या नामकरणाचा प्रश्‍न

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील किनगाव येथील प्रवेशद्वाराच्या नामकरणाचा तिढा हा ग्रामसभेच्या माध्यमातून यशस्वीपणे सोडविण्यात आला आहे.

तालुक्यातील किनगाव येथील गावाच्या मुख्य प्रवेशद्वारास नामकरण करण्यात साठी किनगाव बुद्रुक ग्रामपंचायतीची विशेष ग्रामसभा शांततेत संपन्न झाली व अखेर यात ग्रामसभेसमोर प्रवेशव्दाराचे नामकरण निश्चित झाले. यावेळी ग्रामपंचायतच्या वतीने घेण्यात आलेल्या या विशेष ग्रामसभेत प्रवेशव्दाराच्या प्रलंबित नामकरणासाठी ग्रामस्थांच्या वतीने३ नावे सुचवण्यात आली होती यातील आई तुळजा भवानी माता प्रवेशव्दार या नावावर बहुमातांनी शिक्कामार्तब करण्यात आले

किनगाव गावात अंकलेश्वर-बर्‍हाणपूर राज्य मार्गावरून गावात जाणारा रस्ता आहे. या रस्त्याचे मुख्य प्रवेशव्दार किनगावचे माजी आ.रमेश विठ्ठल चौधरी यांच्या प्रयत्नातुन झालेले होते. मात्र या प्रवेशद्वारावर नामकरण झालेले नव्हते तर या मुख्य प्रवेशद्वाराला नामकरण करण्यात यावे या संदर्भात सरपंच निर्मला पाटील यांच्या कडे ग्रामस्थांकडुन अर्ज प्राप्त झाले होते. त्यांनी या अर्जाच्या अनुषंगाने गुरूवारी विशेष जाहीर ग्रामसभा बोलावली होती.

या सभेच्या अध्यक्षस्थानी किनगावच्या सरपंच निर्मला पाटील या होत्या. तर माजी आमदार रमेश चौधरी,निवासी नायब तहसिलदार संतोष विनंते,माजी जिल्हा परिषद सदस्य रत्ना चौधरी, यावल पंचायत समितीचे माजी उपसभापती उमाकांत पाटील, उपसरपंच लुकमान तडवी,संजय पाटील, विस्तार अधिकारी किशोर सपकाळे,पोलिस पाटील रेखा नायदे इ.सह सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांची मोठया संख्येत उपस्थिती होती.

या ग्रामसभेत मुख्य प्रवेशव्दारावर नामकरण करण्यासाठी अर्ज मांगण्यात आले होते. यात आई तुळजा भवानी माता प्रवेशव्दार,संविधान प्रवेशव्दार आणी शाहु,फुले,आंबेडकर प्रवेशव्दार हे तीन नावं अर्जाव्दारे सुचवण्यात आले होते. या प्रवेशव्दाराचे नामकरण करतांना संपुर्ण गावकर्‍यांचे मतं जाणून घेत निर्णय व्हावा या उद्देशाने आपण ग्रामसभा बोलावली होती व ग्रामसभेतुन निर्णय व्हावा म्हणुन या पुर्वीचं सदस्यांची सभा घेवुन त्यांना देखील विश्वासात घेतले व सर्वानुमते निर्णय घेणे शक्य झाले असेही सरपंच निर्मलाताई यांनी सांगीतले.या विशेष ग्रामसभेसाठी तरूणांनसह महिला व ग्रामस्थांचे मोठे सहकार्य लाभले.

Exit mobile version