Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

फक्त ३०० रूपयांसाठी पत्नीची विटांनी ठेचून हत्या

murder

 

बीड (वृत्तसंस्था) फक्त ३०० रुपयांचा हिशेबाच्या शुल्लक कारणावरून पतीने पत्नीची विटांनी ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना बीडच्या अंबेजोगाई तालुक्यातील सातेफळ शिवारात घडली आहे.

अशोक आणि दिपाली असे त्या दाम्पत्याचे नाव आहे. वीट भट्टीवर काम करणाऱ्या या दाम्पत्यात ३०० रूपयांच्या हिशेबावरून मंगळवारी रात्री वाद झाला. त्यानंतर अशोक गुलाब नरसिंगे याने पाच महिन्यांच्या चिमुरडीसमोरच पत्नी दिपालीला विटांनी ठेचून मारले.दरम्यान, दिपालीची हत्या करून परराज्यात पसार होण्याच्या तयारीत असलेल्या अशोक याला उस्मानाबाद येथून अटक करण्यात आली.

Exit mobile version