Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पळवून नेत महाविद्यालयीन तरूणीवर अत्याचार; तालुका पोलिसात एकावर गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी ।  तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या २१ वर्षीय तरूणीला परस्पर महाविद्यालयातून पळवून नेत इंदौर आणि प्रितमपूर येथे नेवून अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रात्री उशीरा जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील एका गावात २१ वर्षीय तरूणी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. जळगाव शहरातील एका महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेत आहे. तरूणीच्या चुलत भावाच्या लग्नात सागर सपकाळे या तरूणाशी ओळख झाली होती. त्यानंतर तरूणीचे महाविद्यालयात परिक्षा सुरू असतांना ३ जुन रोजी महाविद्यालयात परिक्षा देण्यासाठी गेली होती. त्यावेळी महाविद्यालयाच्या बाहेर सागर सपकाळे हा दुचाकी घेवून थांबलेला होता. दरम्यान तरूणीचा पेपर सुटल्यानंतर तिला काहीतरी फूस लावून दुचाकीवर बसवून घेवून गेला. लक्झरीमध्ये बसवून तिला इंदौर आणि प्रितमपूर येथे लॉजवर नेवून अत्याचार केला. दरम्यान हा प्रकार घडल्यानंतर पिडीत तरूणीने जळगावात येवून नातेवाईकांसोबत तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. तरूणीच्या फिर्यादीवरून १९ जुलै रोजी रात्री उशीरा संशयितआरोपी सागर सपकाळे यांच्या विरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version