Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पिंप्राळ्यातून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले; तरूणावर गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी । पिंप्राळा भागातून १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवत फुस लावून पळवून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, जळगाव शहरातील पिंप्राळा भागात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहेत. २८ डिसेंबर रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास मुलगी घरी असतांना संशयित आरोपी करण अर्जून राठोड रा. घाणेगाव तांडा ता. सोयगाव जि. औरंगाबाद याने लग्नाचे आमिष दाखवत फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार समोर आला आला. मुलीच्या कुटुंबियांनी परिसरात व नातेवाईकांकडे शोधाशोध सुरू केली परंतू ते आढळून आली नाही. याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी संशयित आरोपी करण अर्जून राठोड याच्यावर रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाळ देशमुख हे करीत आहे.

 

 

Exit mobile version