Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मराठी शिकवण्याची तळमळ असलेल्या खान यांची अनोखी धडपड (व्हिडीओ)

khan mulakhat

जळगाव, प्रतिनिधी | समाजात वावरताना अनेकांना आपली मातृभाषा मराठी लिहिता येत नसल्याने कागदोपत्री व्यवहारात अनेक अडचणींचा सामना करावा लागत असतो. तसेच महाराष्ट्रात राहणाऱ्या अमराठी माणसाना विशेषत: उर्दू भाषिक व्यक्तींनाही मराठी बोलता किंवा लिहिता येत नसल्याने अडचणी येत असतात. अशा लोकांची मदत करण्यासाठी जि.प. तून सेवानिवृत्त झालेल्या ए.ए. खान यांनी मराठी आणि उर्दू भाषेत ‘सहज मराठी शिका’ या नावाने दोन पुस्तके लिहिली आहेत. ही दोन्ही पुस्तके अतिशय उपयुक्त असून त्याचा अनेकांना लाभ होत आहे. त्यांना ही पुस्तके लिहिण्याची प्रेरणा कुठून मिळाली ? त्यासाठी कुणाचे सहकार्य लाभले ? पुस्तकांना कसा प्रतिसाद लाभतोय ? तसेच एकूणच त्यांचा त्यासाठीचा दृष्टीकोन काय आहे ? याबाबत नुकताच ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’च्या वतीने लेखक चंद्रकांत भंडारी यांनी त्यांच्याशी संवाद साधला.

 

सध्या त्यांची ही पुस्तके सवलतीच्या दरात उपलब्ध आहेत. तसेच ‘हज गाईड’ नावाचे आणखी एक मार्गदर्शक पुस्तकही त्यांनी लिहिले आहे. एकूणच श्री. खान यांचा प्रवास कसा आहे ? याबद्दल आमच्या वाचक-दर्शकांसाठी सादर आहे त्यांच्याच शब्दातली ही माहिती…

 

 

Exit mobile version