Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

खान्देश माळी महासंघातर्फे सावित्रीच्या लेकी जीवनगौरव पुरस्कार जाहीर

ravwer news1

रावेर प्रतिनिधी । खान्देश माळी महासंघातर्फे तालुका व परिसरातील सामाजिक व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पाच महिलांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनानिमित्त देण्यात येणाऱ्या सावित्रीच्या लेकी जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला.

सावित्रीबाई फुले नगरात ४ जानेवारी शनीवार रोजी संध्याकाळी 10.30 वाजता कार्यक्रम होईल. यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या प्रसंगी समाज प्रबोधनासाठी अनुराधा मुकेश कोकणी (नवापूर) यांचे जाहीर व्याख्यान वडिलांचे संघर्षमय जीवन या विषयावर होईल. मुख्याध्यापिका रेखा रविंद्र जोशी (मुंजलवाडी), सरपंच शारदा पाटील (वाघोड), उपशिक्षिका कल्पना दिलीप पाटील (निंबोल), नगरसेविका संगीता भास्कर महाजन (रावेर), अंगणवाडी सेविका व अध्यक्ष मातारमाई महिला बचतगट संगीता राजेंद्र अटकाळे (रावेर) या पाच महिलांना पुरस्कार जाहीर झाला आहे. कार्यक्रमास परिसरातील मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा कार्याध्यक्ष शकुंतला महाजन, मार्गदर्शक कांतीलाल, महाजन, तालुकाध्यक्ष पिंटू महाजन युवा अध्यक्ष प्रकाश महाजन यांच्यासह खानदेशी माळी महासंघतर्फे करण्यात आला आहे.

Exit mobile version