सावदा येथे ‘खंडेराव व म्हाळसा’ विवाह संपन्न

सावदा ता.रावेर प्रतिनिधी | आपल्या भारतीय संस्कृतीत विविध रूढी परंपरा साजऱ्या केल्या जातात. याच परंपरेचा एक भाग म्हणून सावदा येथील खंडेराव मंदिरात पौष पौर्णिमेनिमित्त ‘खंडेराव व म्हाळसा’ यांचा विवाह संपन्न झाला.

दरवर्षी पौष पौर्णिमेनिमित्त सावदा येथील खंडेराव मंदिरात ‘खंडेराव व म्हाळसा’ यांचा विवाह सोहळा थाटामाटात पार पडतो. भाविक यात श्रद्धेनं भाग घेतात. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा सोहळा छोटेखानी स्वरूपात कार्यक्रम पार पडला.

आज सोमवार, दि.१७ जानेवारी रोजी सावदा येथील खंडेराव मंदिरात संतोष महाराज शास्त्री यांनी मंत्र पठण करून विवाह लावला. वर पक्षाच्या वतीने अंतरपाठ धरण्याचा मान नोमदास भंगाळे यांना तर वधू पक्षाच्या वतीने प्रशांत महाजन यांना मिळाला.

या सोहळ्याला मंदिराचे पुजारी राहूल महाराज, अशोक महाराज, रामदास नेमाडे, अक्षय, विश्वनाथ वाघुळदे, भुसावल शिवसेना महीला जिल्हाप्रमुख पुनम ब-हाटे, माधुरी पवार, हेमांगी चौधरी, माजी.नगराध्यक्षा सरोदे ताई, राहूल महाराज, ईश्वर नेमाडे, राजेंद्र चौधरी माजी.नगराध्यक्ष नंदू तांबटकर आणि नागरिकांची यावेळी उपस्थिती होती.

Protected Content