खामगाव येथे वासूदेवाची वारी; समाज मात्र विकासापासून दुरच (व्हिडीओ)

buldhana news 1

खामगाव (अमोल सराफ) । वासुदेव परंपरा लोप पावण्याच्या मार्गावर असताना आज (२९ डिसेंबर) रोजी बुलढाणातील खामगाव येथे ‘वासुदेव आला हो वासुदेव आला, सकाळच्या पारी हरिनाम बोला, वासुदेव आला हो वासुदेव आला’ हे गाणं काना वर पडलं व त्यानंतर समोर दिसलेय रंग बिरंगे पोशाखातील लोभस ध्यान डोळ्यासमोर उभं राहतं वासुदेव म्हणजे अंग भरून पोशाख हातात टाळ चिपळ्या डोळ्यात विविध रंगी कावळ्यांच्या माळांनी गुंतलेला मोरपिसांचा टोप कपाळी गंध गळ्यात विविध देवतांचा माळा कमरेला बासरी असं हवाहवासा वाटणारा देखणे रूप एकदा पेहरावातील या वासुदेवाला पहाटेच्या प्रहरी गाणं म्हणत मागत फिरताना पाहणं हा मन प्रसन्न करणारा अनुभव आला.

वासुदेव आला हे गाणं ऐकून मन प्रसन्न होऊन जातं. पुर्वी गावात आलेल्या वासुदेवाला मान मिळायचा लोक हातातलं काम सोडून घटकाभर त्याला दादा देते वासुदेवाला दान देताना घरच्या लक्ष्मीचा हात कधी अकडत नसे. शहरांमधील वसाहती सोसायट्यांमधील कप्पेबंद वातावरणामुळे वासुदेव आला या ठिकाणी प्रवेश मिळत नाही. घराचे बंद दरवाजे आणि लोकांची उशिरा उठणे, वासुदेवाला अगणित बनते. वासुदेवाला ऐकायला कोणी नाही हे वासुदेवासाठी वेदनादायी आहे. वासुदेवाच्या भावी पिढीला पहाटे उठून अंघोळ पोशाख कळविणे, गाणे म्हणणे मान्य नसल्याने ही मुले वासुदेव न होता शिक्षण घेऊन व्यवसाय अथवा नोकरी करणे पसंत करीत आहेत. आळंदी येथील दीडशे-दोनशे घरात परंपरागत वासुदेवाला वारसा पिढीजात सुरू आहे. येथील वासुदेव समाजातील बहुतांशी कुटुंब उदरनिर्वाहासाठी पुणे-नगर नाशिक या ठिकाणी भटकंती करीत आहेत. बदलत्या काळात हा समाज विकासापासून दूर फेकला गेला, लाईव्ह ट्रेंड न्यूज सोबत खास वासुदेव सोळंके आळंदी पुणे सोबत बातचीत..

Protected Content