खामगाव आरोग्य शिबिर ठरले नवसंजीवनी; म.फुले योजनेंतर्गत मोफत उपचार

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । हृदयाला रक्‍तपुरवठा करणार्‍या मुख्य रक्‍तवाहिनीत ब्लॉक आल्याने तसेच अन्य रक्‍तवाहिन्याच्या मुखाशीच ब्लॉक आढळलेल्या ५२ वर्षीय रुग्ण महिलेला डबल हार्टअटॅक आला, त्याचवेळी सुरु असलेल्या आरोग्य शिबिरातून रुग्णाला थेट डॉ.उल्हास पाटील रुग्णालयातील हृदयालयात आणून तातडीने एन्जीओग्राफीसह एन्जीओप्लास्टी करत जीवनदान देण्यात डॉक्टरांना यश आले. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत रुग्णावर मोफत उपचार करण्यात आले.

खामगाव तालुक्यातील वाडी येथील रहिवासी सविता प्रकाश दामोदर (वय वर्ष ५२) यांना काही दिवसांपासून छातीत दुखत होते. दरम्यान खामगाव येथे आयोजित आरोग्य शिबिरात रुग्ण महिला आली, यावेळी हृदयविकार तज्ञांना रुग्णाचे लक्षण हे हार्टअटॅक असल्याचे दिसून आले असता तात्काळ ईसीजी व टू डी इको तपासणी करण्यात आली. यात हार्ट अटॅक येवून गेल्याचे दिसत होते, तात्पुरते औषधोपचार करत पुढील उपचारासाठी रुग्णाला डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात हलविण्यात आले. रुग्णालयात दोन हृदयविकार तज्ञ असून मुंबई येथून डीएम काडियोलॉजिस्ट पदवी संपादन केलेले डॉ.वैभव पाटील व बंगळूरु येथून पदवी प्राप्त केलेले डॉ.प्रदिप देवकाते यांची सेवा २४ तास उपलब्ध असते, त्यामुळे रुग्णावर तातडीने गोल्डन अवर्समध्ये उपचार होतात.

हायरिस्क एन्जीओप्लास्टी यशस्वी 

रुग्णाच्या मुख्य रक्‍तवाहिनीला एक ब्लॉक तसेच अन्य रक्‍तवाहिन्याच्या मुखाशीच ब्लॉक निर्माण झाल्याचे दिसले. अशा रुग्णांना बायपासची आवश्यकता असते मात्र रुग्णाची प्रकृती पाहता नातेवाईकांच्या संमतीने तातडीने हृदयविकार तज्ञ डॉ.प्रदिप देवकाते यांनी एन्जीओप्लास्टी केली. काही वेळातच रुग्णाची प्रकृती स्थिर होवून पंपिंग रेटही वाढला.

एक हजारात दोन ते तीन रुग्ण 

सामान्यतः स्त्रियांमध्ये हार्ट अटॅक हा साठीनंतर येत असतो. मात्र रजोनिवृत्तीनंतर हार्मोन्सचे संतुलन बिघडते. या रुग्णाच्या डाव्या बाजूच्या नसेला समोरच ब्लॉक होता, असा ब्लॉक १ हजार रुग्णांमधून २ ते ३ रुग्णांना असतो. याशिवाय मुख्य रक्‍तवाहिनीला असलेला ब्लॉक हा ९५ टक्के होता.

कठीण व गुंतागुंतीची एन्जीओप्लास्टी

डबल अटॅक आलेल्या रुग्णाचे प्राण वाचविणे हे डॉक्टरांसमोर आव्हान होते. अत्यंत कठीण आणि खूप गुंतागुंतीची अशीही एन्जोप्लास्टी करुन रुग्णाचा जीव वाचविण्यात डॉक्टरांना यश आले. यावेळी रेसिडेंट डॉ.जुनेद कामेेली, डॉ.तेजस कोटेचा यांच्यासह नर्सिंग स्टार दिपाली भामरे गोल्डी सावले, सुमीत भारंबे, देवयानी, प्रतिमा, डिंपल, मोहिनी यांनी रुग्णांची देखभाल केली.

योजनेंतर्गत मोफत उपचार 

खामगाव आरोग्य शिबिरातून माझ्या आईवर उपचाराचा मार्ग दिसला. संपूर्ण उपचार महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतून मोफत करण्यात आले. रुग्णालयात खूप चांगले उपचार मिळाले, आम्ही समाधानी आहोत. कोणालाही काही आरोग्याची समस्या असल्यास डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात येवून उपचार घ्यावे, असे मी आवाहन करतो.

 

Protected Content